डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील आडिवली ढोकळी गावात एका १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३२ वर्षीय परप्रांतीय इसमाला मानपाडा पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. धर्मेंद्रे देवेन यादव (३२) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, पीडित मुलगी शनिवारी दुपारी आरोपी धर्मेंद्र यादव याच्या मुलांसोबत नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी धर्मेंद्रने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिला शयनगृहात नेऊन तिच्या सोबत अश्लिल चाळे केले. तेथे तिचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून धमकी दिली.
हेही वाचा : ठाणे : इस्कॉन मंदिरातील सोहळ्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता
मुलीने घरी आल्यानंतर वडिलांना स्वता सोबत घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठले. तेथे धर्मेंद्र विरूध्द तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या पथकाने गुन्हा दाखल होताच, धर्मेंद्र यादवला तात्काळ अटक केली. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने धर्मेंद्र विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.