डोंबिवली : येथील पश्चिमेतील कुंभारखाणपाडा खाडी किनारी शनिवारी दुपारी दीड वाजता खेळताना खाडीत पडलेल्या आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला वाचविताना मुलीसह वडील वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली. पाच तास अग्निशमन दल, पोलिसांच्या पथकांनी शोध घेऊनही बुडालेल्या दोघांचा शोध लागलेला नाही. या दुर्देवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल सुरवाडे (४०, रा. गणेशनगर), इरा सुरवाडे (अडीच वर्ष) अशी खाडीत वाहून गेलेल्या वडील, मुलीची नावे आहेत. अनिल हे कुटुंबीयांसह गणेशनगरभागात राहतात. त्यांना पत्नी, एक मुलगी आहे. मिळालेली माहिती, अशी शनिवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान अनिल सुरवाडे आपली चिमकुली मुलगी इरा हिला येऊन कुंभारखाणपाडा खाडी किनारी खेळण्यासाठी घेऊन आले होते. खाडीला ओहटी होती. खाडीत जाण्यासाठी काँक्रीटचा उतार कट्टा (जेट्टी) आहे. या उतार कट्ट्याच्या खाडीकडील भागात इरा आपल्या खेळाच्या वस्तू घेऊन खेळत होती. खाडीत तेथे पडलेल्या वस्तू फेकून आनंद घेत होती. खेळताना तिने पायातील चपला काढून ठेवल्या होत्या. तिचे कपडे बाजुला ठेवले होते. ती खेळत असल्याने वडील तिच्यापासून काही अंतरावर बसले होते.

हेही वाचा : कचऱ्याची परिसरातच लावली जाणार विल्हेवाट; ठाणे महापालिकेचे विविध भागात छोटे प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
police Pune, police at night, Pune, police news,
पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
Fire Lonar Rural Hospital, Lonar Rural Hospital Patient died,
बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे…

खेळताना इरा उतार जेट्टीच्या एकदम कडेला गेली. तिचा तोल जाऊन ती खाडीत पडली. मुलगी खाडीत पडून वाहून जात असल्याचे निदर्शनास येताच वडील अनिल यांनी धावत जाऊन खाडीत उडी मारली. खाडी किनारी गाळ, पाण्याचा वेगवान प्रवाह असल्याने मुलगी वाहून गेली. तिला वाचविताना अनिल यांना किनारचा गाळ, खाडीतील दुर्गंधीयुक्त पाणी यांचा अडथळा आला. त्यामुळे वाहत्या पाण्या बरोबर अनिल वाहून जाऊ लागले. ते स्वतःचा बचाव करू शकले नाहीत. दहा फुटापर्यंत ते पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहून गेले. बचावासाठी त्यांनी हात वर केले आणि ते कायमचे बुडाले.

उतार जेट्टीपासून काही अंतरावर दोन तरूण एका झाडाखाली बसले होते. त्यांना अनिल यांनी बुडताना वर केलेला हात पाहिला. या दोन्ही तरूणांना खाडी किनारी वडील आणि त्यांची चिमुकली मुलगी अचानक गायब दिसल्याचे दिसले. किनाऱ्यावर मुलीचे चप्पल, खेळातील बाहुल्या, तिचे कपडे पडले होते. खाडी किनारी खेळत असलेली चिमुकली आणि तिचे वडील खाडीत पडून वाहून गेल्याची खात्री पटल्यावर या दोन्ही तरूणांनी तातडीने विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांना संपर्क केला.

हेही वाचा : ठाणे : पत्नी आणि मुलांची हत्या करणारा अखेर अटकेत

खंदारे यांनी तातडीने पालिकेच्या गरीबाचापाडा येथील अग्निशमन केंद्राला माहिती दिली. अग्निशमन जवान आणि पोलिसांची पथके तातडीने कुंभाऱखाणपाडा खाडी किनारी पोहचली. त्यांनी कुंभारखाणपाडा, गणेशनगरते देवीचापाडा खाडी किनारा असा पाच ते सहा किलोमीटरचा खाडीचा पट्टा बोटीच्या साहाय्याने शोधला. परिसरात बाळ किंवा आजोबा आढळून आले नाहीत. शोध पथकाने पुन्हा देवीचापाडा ते कुंभारखाणपाडा अशी उलट्या दिशेने शोध मोहीम राबवली. खाडी किनारच्या खारफुटीत दोघे अडकलेत आहेत का याचा शोध घेतला. बुडालेल्या व्यक्ति संध्याकाळी उशिरापर्यंत आढळून आल्या नाहीत. त्यांचे शोधकार्य अग्निशमन जवानांनी प्रखर झोताचे दिवे लावून सुरूच ठेवले आहे.

हेही वाचा : नाताळनिमित्त बाजारपेठा सजल्या

खाडी किनारी येणाऱ्या पोहच रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून बुडालेल्या व्यक्तिंची ओळख पोलिसांनी पटवली. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. ओहटीमुळे या दोन्ही व्यक्ति खाडीच्या आतील खोल भागात खेचल्या गेल्या असाव्यात. २४ तासानंतर त्या खाडी किनारी लागण्याची शक्यता तपास पथकांकडून व्यक्त केली जात आहे.

“कुंभारखाणपाडा खाडी किनारी वडील, मुलगी वाहून गेल्याची माहिती आहे. त्यांचे दुपारपासून अग्निशमन जवान, पोलीस पथके शोध घेत आहेत. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.” – मोहन खंदारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे.

Story img Loader