डोंबिवली : येथील पश्चिमेतील कुंभारखाणपाडा खाडी किनारी शनिवारी दुपारी दीड वाजता खेळताना खाडीत पडलेल्या आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला वाचविताना मुलीसह वडील वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली. पाच तास अग्निशमन दल, पोलिसांच्या पथकांनी शोध घेऊनही बुडालेल्या दोघांचा शोध लागलेला नाही. या दुर्देवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल सुरवाडे (४०, रा. गणेशनगर), इरा सुरवाडे (अडीच वर्ष) अशी खाडीत वाहून गेलेल्या वडील, मुलीची नावे आहेत. अनिल हे कुटुंबीयांसह गणेशनगरभागात राहतात. त्यांना पत्नी, एक मुलगी आहे. मिळालेली माहिती, अशी शनिवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान अनिल सुरवाडे आपली चिमकुली मुलगी इरा हिला येऊन कुंभारखाणपाडा खाडी किनारी खेळण्यासाठी घेऊन आले होते. खाडीला ओहटी होती. खाडीत जाण्यासाठी काँक्रीटचा उतार कट्टा (जेट्टी) आहे. या उतार कट्ट्याच्या खाडीकडील भागात इरा आपल्या खेळाच्या वस्तू घेऊन खेळत होती. खाडीत तेथे पडलेल्या वस्तू फेकून आनंद घेत होती. खेळताना तिने पायातील चपला काढून ठेवल्या होत्या. तिचे कपडे बाजुला ठेवले होते. ती खेळत असल्याने वडील तिच्यापासून काही अंतरावर बसले होते.
डोंबिवलीत कुंभारखाणपाडा खाडीत चिमकुलीसह वडील बुडाले, अग्निशमन दलासह पोलिसांकडून शोधकार्य सुरू
पाच तास अग्निशमन दल, पोलिसांच्या पथकांनी शोध घेऊनही बुडालेल्या दोघांचा शोध लागलेला नाही. या दुर्देवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Written by लोकसत्ता टीम
डोंबिवली
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-12-2023 at 21:20 IST
TOPICSकल्याण डोंबिवलीKalyan DombivliडोंबिवलीDombivliपाणीWaterपोलीसPoliceमराठी बातम्याMarathi Newsमृत्यूDeath
+ 2 More
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli father and girl child drowned in kumbharkhan pada creek search operation launched by fire brigade and police css