डोंंबिवली: डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांंधकाम परवानग्या न घेता, महारेराचा नोंदणी क्रमांंक मिळवून उभारलेली बेकायदा इमारत पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या तोडकाम पथकाने पोकलेन यंंत्राच्या साहाय्याने भुईसपाट केली. पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता अशा इमारतींना महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाचा (महारेरा) नोंंदणी क्रमांंक मिळवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका ग्राहकांना बेमालुमपणे विकून त्यांची फसवणूक करण्याचा उद्देश भूमाफियांचा होता. याप्रकरणी प्रसिध्द वास्तुविशारद संदीप पाटील यांंनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून तत्कालीन पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी अशी बेकायदाशीर कृती करणाऱ्या डोंबिवलीतील ६५ भूमाफियांवर नगररचना अधिकाऱ्यांच्या साह्याय्याने मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
या गन्ह्यात कुंभारखाणपाडा येथील अजिंक्य नारकर आणि सुनील नारकर या बंधूंंनी वास्तुरचना वास्तुविशारद फर्मचे पांडुरंग म्हात्रे यांच्या साहाय्याने उभारलेल्या सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचा समावेश होता. यापूर्वी या इमारतीवर दोन ते तीन वेळा जुजुबी कारवाई यापूर्वीच्या साहाय्यक आयुक्तांकडून करण्यात आली होती. हरितपट्ट्यातील अडगळीच्या जागेत असलेल्या या इमारतीचे पाडकाम साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांंच्या मार्गदर्शनाखाली तोडकाम पथकाने मागील पधरा दिवसांंपासून पोकलेन यंंत्राच्या साहाय्याने सुरू केले होते. या इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांंवर खूप राजकीय दवाव होता. परंतु, साहाय्यक आयुक्त सावंत यांंनी हे दबाव न जुमानता आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून ही बेकायदा इमारत बुधवारी भुईसाट केली.
हेही वाचा : ठाण्यात राजन विचारेंच्या शक्तीप्रदर्शनाला जुन्या जाणत्यांची साथ, इंडिया आघाडीतील घटक पक्षही सहभागी
या कारवाईने भूमाफियांना मोठा तडाखा बसला आहे. या कारवाईने भूमाफियांचे सुमारे दोन ते तीन कोटीचे नुकसान झाल्याचे समजते. या इमारतीत एका माजी नगरसेवकाने ‘खुशी’ (बोनस) म्हणून दोन ते तीन सदनिकांची मागणी भूमाफियांकडे केली होती. या कारवाईनंतर ह प्रभागाकडून ठाकुरवाडीतील अग्निदेवी मंदिराजवळ उभारलेली प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांंची फशी हाईट्स, गटारावर उभारेली बेकायदा इमारत, राहलुनगर मधील रमाकांत आर्केड, सुदामा हाईट्स आणि खंडोबा मंदिर भागातील बेकायदा इमारती, गरीबाचापाडा येथील वसंत हेरिटेज, जुनी डोंबिवलीतील शाळेच्या आरक्षणावरील शिव लिला आणि कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याच्या खुराड्यावर कधी कारवाई केली जाते याकडे नागरिक, तक्रारदारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : कल्याण लोकसभेत वैशाली दरेकर यांच्या प्रचार दौऱ्याकडे ज्येष्ठ शिवसैनिकांची पाठ
कुंंभारखाणपाडा हरितपट्ट्यातील महारेरा गुन्ह्यातील अजिंक्य, सुनील नारकर बंधूंची बेकायदा इमारत भुईसपाट केली आहे. अशाच पध्दतीने पोलीस बंदोबस्त मिळेल त्याप्रमाणे ह प्रभागातील इतर बेकायदा इमारती, महारेरा गुन्ह्यातील बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.
राजेश सावंत (साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली)