डोंंबिवली: डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांंधकाम परवानग्या न घेता, महारेराचा नोंदणी क्रमांंक मिळवून उभारलेली बेकायदा इमारत पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या तोडकाम पथकाने पोकलेन यंंत्राच्या साहाय्याने भुईसपाट केली. पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता अशा इमारतींना महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाचा (महारेरा) नोंंदणी क्रमांंक मिळवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका ग्राहकांना बेमालुमपणे विकून त्यांची फसवणूक करण्याचा उद्देश भूमाफियांचा होता. याप्रकरणी प्रसिध्द वास्तुविशारद संदीप पाटील यांंनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून तत्कालीन पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी अशी बेकायदाशीर कृती करणाऱ्या डोंबिवलीतील ६५ भूमाफियांवर नगररचना अधिकाऱ्यांच्या साह्याय्याने मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा