डोंबिवली – डोंबिवली, कल्याण परिसरात घरफोड्या, लुटमार, दरोडे, शस्त्राचा धाक दाखवून पादचारी, वाहन चालकांना लुटण्याचे गुन्हे करणाऱ्या चारजणांना मानपाडा पोलिसांच्या विशेष तपास पथकांनी मंगळवारी अटक केली. या टोळीतील एकजण फरार आहे. चारजणांविरुद्ध कल्याण परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ३२ गुन्हे दाखल आहेत. या टोळीत एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे.

आरोपींकडून लॅपटाॅप, नऊ मोबाईल, रोख रक्कम, ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या रमेश जमादार, शिवा रुपीलाल तुसंबल, सत्यप्रकाश मुकेशकुमार कनोजिया, काळू उर्फ अर्जुन चिमन लोट आणि एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
Vishal Gawli Sakshi Gawli the killers of a minor girl in Kalyan remanded in police custody till January 2 kalyan news
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

हेही वाचा – कल्याणमधील बारावे येथील कचराभूमीला भीषण आग

मुंबईत गोवंडी येथे राहणारे ओला चालक राजन चौधरी (२२) यांना गेल्या आठवड्यात रात्री तीन वाजता कल्याण पूर्वेत प्रवाशांच्या प्रतीक्षेत असताना डोंबिवलीत घरडा सर्कल येथे जाण्यासाठी तीन प्रवाशांनी विचारणा केली. चौधरी तिन्ही प्रवाशांना घेऊन घरडा सर्कल येथे आले. त्यावेळी एका रिक्षा चालकाने चौधरी यांच्या मोटीराला मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. चालकाने रिक्षा चौधरी यांच्या मोटारीच्या पुढे नेऊन उभी केली. रिक्षेतून दोन प्रवासी उतरले. त्यांनी ओला चालक चौधरी यांच्याशी स्वताहून वाद घातला. आपली चूक नसताना तुम्हीच माझ्याशी भांडता, असे चौधरी बोलू लागले. वाद वाढल्याने चौधरी ओला कारमधून बाहेर उतरून रिक्षेमधील प्रवाशांना बोलू लागले. यावेळी चौधरी यांच्या ओला कारमध्ये बसलेल्या तीन प्रवाशांनी चौधरी यांचे कारमधील दोन मोबाईल घेतले. तेही मोटारीतून खाली उतरले आणि रिक्षा चालकाची बाजू घेऊन चौधरी यांच्याशी भांडून त्यांना पाचजणांनी मिळून मारहाण केली. चौधरी यांच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. पाचहीजण नंतर घरडा सर्कल येथून पळून गेले.

हेही वाचा – ठाण्यात करोना रुग्ण वाढ कायम; महिनाभरात सहाजणांचा मृत्यू, तर एच ३ एन २ आजारामुळे दोन मृत्यू

ओला चालक चौधरी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी तात्काळ तपास पथके तयार केली. घरडा सर्कल भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. चित्रणावरून आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत पोलिसांनी आरोपींना अटक केली. या आरोपींनी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर भागातील विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या, लुटमार, शस्त्राचा धाक दाखवून लुटणे असे प्रकार केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या आदेशावरून साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ निरीक्षक बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, साहाय्यक निरीक्षक सुरेश डांबरे, अविनाश वनवे, सुनील तारमळे, उपनिरीक्षक भानुदास काटकर, हवालदार विकास माळी, सुनील पवार, संजय मासाळ, गिरीश पाटील, अशोक आहेर, विजय आव्हाड यांच्या पथकाने आरोपींच्या अटकेची कारवाई केली. शिवा तुसांबर विरुद्ध रामनगर, खडकपाडा, मानपाडा पोलीस ठाण्यात सात गुन्हे, चंद्रकांत जमादार विरुद्ध रामनगर, मानपाडा, टिळकनगर पोलीस ठाण्यात १० गुन्हे, अर्जुन लोटविरुद्ध चार गुन्हे आणि बालकाविरुद्ध एक गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे.

Story img Loader