डोंबिवली : येथील औद्योगिक क्षेत्रातील भागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. मुबलक पाणी येत नसल्याने रहिवासी हैराण आहेत. अनेक रहिवासी विकतचे पाणी आणून घरात वापरत आहेत. एमआयडीसी परिसरात नव्याने गृहसंकुले उभी राहत आहेत. या भागाचा पाणी पुरवठा त्या भागात वळविला जात आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी पाणी टंचाईची परिस्थिती यापूर्वी नव्हती. नवीन गृहसंकुले वाढल्यापासून हे प्रकार सुरू आहेत, असे रहिवाशांनी सांगितले. या कमी दाबाच्या पाणी टंचाई बाबत एमआयडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सांगूनही त्याची दखल घेतली जात नाही. एमआयडीसीतील बहुतांशी रहिवासी वर्ग नोकरी, व्यवसायातील आहे. नोकरी, मुलांच्या शाळा सांभाळून रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही रहिवासी घरा लगतच्या कुपनलिकेतील पाणी स्वच्छता गृहात वापरून वेळ निभावून नेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा