डोंबिवली : डोंबिवलीतील नांदिवली पंचानंद येथे सात माळ्याची बेकायदा इमारत उभारून या इमारतीला महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या इमारतीमधील सदनिका ग्राहकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकासकाची इमारत ई प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी शक्तिमान कापकाम यंत्राच्या साहाय्याने दोन दिवसांत भुईसपाट केली.

नांदिवली पंचानंद येथे जमीन मालक अशोक माणिक म्हात्रे यांनी वास्तुशिल्पकार मे. गोल्डन डायमेंशन यांच्या सहकार्याने तीन वर्षापूर्वी सात माळ्याची दोन पाख्यांची बेकायदा इमारत उभारली होती. या इमारतीचा बांधकाम आराखडा भूमाफियांनी पालिकेकडून मंजूर करून घेतला नव्हता. या इमारतीला भूमाफियांनी बनावट बांधकाम परवानगींच्या आधारे महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून ही बेकायदा इमारत अधिकृत आहे, असे दाखवून घर खरेदीदारांना या इमारती मधील सदनिका विकण्याची तयारी केली होती. या बेकायदा इमारतीला महारेराचा नोंदणी क्रमांक मिळविल्याने वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या तक्रारीवरून पालिकेने डोंबिवलीतील ६५ भूमाफियांविरुध्द मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

bombay high court refuses to stop demolition of five illegal buildings in bhiwandi
बेकायदा घराची कागदपत्रेही अनधिकृतच; भिवंडीतील पाच बेकायदा इमारतींना संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
vasai municipal illegal constructions
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय
Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त
Maharashtra Sadan not available for Sahitya Sammelan Delay for four months on fee issue Nagpur news
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना! शुल्काच्या मुद्द्यावर चार महिन्यांपासून खल
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र

हेही वाचा : घोडबंदर मार्गावरील भीषण अपघातात नाशिकमधील एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

मुंबई उच्च न्यायालयाने या ६५ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश, कल्याण डोंंबिवली पालिका प्रशासनाला दिले आहेत. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी पाडकाम पथक, शक्तिमान कापकाम सयंत्राच्या साहाय्याने गेल्या रविवारपासून अशोक म्हात्रे यांची बेकायदा इमारत तोडण्यास सुरूवात केली होती. सोमवारी ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे माफियांना दणका बसला आहे.

ही इमारत तोडण्यापूर्वी या भागातील काही चाळींमधील घरे सुरक्षेचा भाग म्हणून रिकामी करण्यात आली होती. धूळ उडू नये म्हणून आरोग्य विभागातर्फे पाण्याची फवारणी करण्यात आली, असे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले. या बेकायदा इमारत प्रकरणी जमीन मालक अशोक म्हात्रे यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा : ठाण्यासाठी गजानन कीर्तीकरांचा पत्ता कट?

ई प्रभाग हद्दीत महारेराचा नोंदणी क्रमांक मिळविलेल्या सुमारे १५ ते २० बेकायदा इमारती आहेत. या इमारती विहित प्रक्रिया पूर्ण करून जमीनदोस्त केल्या जाणार आहेत, असे पवार यांनी सांगितले. सर्वाधिक इमारती नांदिवली, भोपर, आयरे, निळजे, पी ॲन्ड टी काॅलनी, दत्तनगर प्रभागात आहेत.

ई प्रभागात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारतींवर कारवाईचे नियोजन करून त्या जमीनदोस्त केल्या जात आहेत. अशा नियोजनातील नांदिवलीतील ही इमारत दोन दिवसात भुईसपाट करण्यात आली. इतर इमारतीही अशाच पध्दतीने पुन्हा उभारल्या जाऊ शकत नाहीत, अशा पध्दतीने भुईसपाट केल्या जाणार आहेत.

भारत पवार, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग, डोंबिवली

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पालिका हद्दीतील बेकायदा इमारती नियोजन करून तोडल्या जाणार आहेत. पहिले ६५ महारेरा प्रकरणातील रहिवास नसलेल्या, त्यानंतर इतर बेकायदा इमारती, पोलिसांकडून रहिवास खाली करून या इमारती तोडण्यात येणार आहेत. तसे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त

Story img Loader