डोंबिवली : डोंबिवली शहराच्या पलावा, नवनीतनगर, सोनारपाडा, एमआयडीसी मिलापनगर परिसरात राहत असलेल्या एकूण नऊ जणांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २१ इसमांनी कूटचलन गुंतवणुकीच्या माध्यमातून (क्रीप्टो करन्सी) माध्यमातून २३ लाख १२ हजार ३७८ रूपयांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणातील मुख्य तक्रारदार हे भारतीय नौदलात मुंबईत नोकरी करतात. इतर आठ जण हे विविध व्यवसाय, नोकरीत कार्यरत आहेत. या फसवणूक प्रकरणी नौदल अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी २१ इसमांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात इतर आठ जणांची सह तक्रारदार म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई

हेही वाचा…रस्त्यावर तेल सांडल्याने पाच दुचाकी घसरून अपघात

नौदल अधिकाऱ्याने मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घरी असताना आपण समभाग संलग्न गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो याच्या ऑनलाईन माध्यमातील जाहिराती तपासत होते. यावेळी पाहणीत एक जाहिरात आली. त्या जाहिरातीची कळ दाबताच आपण कूटचलनामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात का, असा प्रश्न समोरून करण्यात आला. आपणास या गुंतवणुकीचे ज्ञान नव्हते. आपण होकार देताच आपणास समोरील महिला अनोळखी व्यक्तिने एक जुळणी पाठवली. आपणास नोंदणीकरण करण्यास सांगितले. आपली बँक खाते माहिती, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे मागविण्यात आली.

आपले नोंदणीकरण झाल्यावर युपीआय माध्यमातून आपणास गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला. गेल्या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या एक महिन्यात १२ लाख ९१ हजार कूटचलन समभाग संलग्न गुंतवणुकीत गुंतवले. ऑनलाईन माध्यमातून आपण ही रक्कम भरणा केली. १२ लाख ९१ हजाराच्या गुंतवणुकीवर आपणास ऑनलाईन माध्यमातून १७ लाख चार हजार रूपयांचा नफा दिसू लागला. नफ्याची रक्कम आपण काढून घेण्याचा निर्णय आला. बँक व्यवहार केल्यानंतर नफ्याची रक्कम आपल्या खात्यावर जमा झाली नाही.

हेही वाचा…बाळकूम भागात एका इमारतीत आग, ४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

आपण तात्काळ संबंधितांंना संपर्क केला. त्यांनी कर अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यास सांगितले. कर अधिकाऱ्याने १७ लाखाच्या नफ्यावर तुम्हाला ३० टक्के म्हणजे पाच लाख ११ हजार रूपये भरावे लागतील, असे सांगितले. रक्कम भरणा केल्यानंतर अधिकाऱ्याने तुमची दोन लाखाची रक्कम ब्लाॅक झाली आहे. तुम्ही ती रक्कम परत भरणा करा, असे सुचवले. आपणाकडून करापोटी सात लाख ११ हजार रूपये उकळण्यात आले. ही रक्कम पुन्हा आपण काढण्याचा प्रयत्न केला. आपणास कर अधिकारी आपली २० लाख दोन हजाराची रक्कम घेऊन पळून गेला आहे, असे कळविण्यात आले. आपली फसवणूक झाल्याने सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करून आपण मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलो. आपणास इतर आठ जणांची फसवणूक झाल्याचे समजले. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे.

Story img Loader