डोंबिवली : येथील एका विवाहितेचा लैंगिक छळ आणि विनयभंग केल्याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. डोंबिवली पूर्वेतील संगीतावाडी भागात पीडित २६ वर्षीय महिला राहते. तिचे मार्च २०१७ मध्ये लग्न झाले. तेव्हापासून सासरा लैंगिक छळ, विनयभंग करत असल्याची तक्रार तिने दिली आहे.
यानुसार रामनगर पोलीस ठाण्यात सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तिचा सासरा बांधकाम व्यावसायिक आहे. वाईट नजरेने पाहणे, स्नानगृहात गेल्यानंतर बाहेर फेऱ्या मारणे, वाहन शिकवण्याचे निमित्त करून अश्लिल चाळे करणे, असे प्रकार सासरे करीत असल्याचा आरोप पिडीतेने केला आहे.