डोंबिवली : येथील एमआयडीसी मधील कावेरी चौकात बुधवारी संध्याकाळी मद्य सेवन करून टेम्पो चालविणाऱ्या एका चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या एका दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

बुध्दशल खंडारे (१६, रा. सोनारपाडा) मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. वैभव शेंडगे (१६) जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. मद्य सेवन करून टेम्पो चालविणाऱ्या चालकाला नागरिकांकडून पकडून बेदम चोप दिला आणि त्यानंतर मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. बुध्दशल खंडारे डोंबिवली एमआयडीसीतील एका शाळेचा विद्यार्थी होता. तो इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. अभ्यासात हुषार होता, असे त्याच्या शिक्षकांनी सांगितले. बुध्दशल आणि वैभव यांच्या परीक्षा सुरू आहेत. बुध्दशल आणि वैभव दोघे संध्याकाळी खासगी शिकवणीला गेले होते. दुचाकीवरून ते एमआयडीसीतील कावेरी चौकातून जात घरी परतत होते. यावेळी फेरीवाले, पादचाऱ्यांनी गजबजलेल्या कावेरी चौकातून एक टेम्पो चालक भरधाव वेगाने टेम्पो चालवत होता.

resident was brutally beaten up after being asked to remove firecracker stalls from the footpath Dombivli news
डोंबिवलीत पदपथावरील फटाके स्टाॅल काढण्यास सांगितल्याच्या रागातून रहिवाशाला बेदम मारहाण; डोंबिवली पश्चिम ह प्रभागातील प्रकार
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Kaveri Chowk in Dombivli MIDC is prone to accidents due to hawkers traffic and vehicles in chowk
डोंबिवली एमआयडीसीतील कावेरी चौकाला फेरीवाल्यांचा विळखा, विद्यार्थ्याच्या मृत्युमुळे कावेरी चौक फेरीवाला मुक्त करण्याची मागणी
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sadanand tharwal left uddhav shiv sena in dombivli
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला रामराम
thane police
डोंबिवलीतील दोन जण पिस्तुलसह कल्याणमध्ये अटक
Dombivli sai residency illegal building
डोंबिवली आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सी जमीनदोस्त
young man died after falling from local train near Dombivli
डोंबिवलीजवळ लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू

हेही वाचा : Kopari Pachpakhadi : कोपरी-पाचपाखाडीत शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे रिंगणात!

या टेम्पो चालकाने मद्य सेवन केले होते. कावेरी चौकात आल्यावर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्याने बुध्दशल खंडारे, वैभव बसलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत बुध्दशल टेम्पोची जोराची धडक बसल्याने जागीच ठार झाला. वैभव टेम्पोच्या धडकेत दूर फेकला गेल्याने तो थोडक्यात बचावला. त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. अपघात होताच नागरिकांनी तात्काळ मानपाडा पोलिसांना कळविले आणि मद्याच्या धुंदीत असलेल्या टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे यांनी सांगितले, याप्रकरणी सविस्तर माहिती हाती आली नाही मात्र टेम्पो चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

Story img Loader