डोंबिवली : येथील पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील उल्हास खाडी भागात शनिवारी दुपारी वडील आणि त्यांची अडीच वर्षाची मुलगी वाहून गेली आहे. शनिवारी दुपारपासून कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस संयुक्तपणे शोध मोहीम राबवित आहेत. ४८ तास उलटूनही बेपत्ता बाप-लेकांचा शोध लागत नसल्याने तपास पथके त्यांचा खाडी भागात शोध घेत आहेत. रविवारी सकाळी बेपत्ता बाप लेकीचा शोध घेत असताना अग्निशमन जवानांना डोंबिवली खाडी किनारा भागात ओहोटीच्यावेळी कल्याण परिसरातून वाहून आलेले एक शव आढळले. ते तपास पथकांनी ताब्यात घेतले आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

हेही वाचा : अनधिकृत बांधकामाप्रकरणी साहाय्यक आयुक्तावर ‘सक्तीच्या रजे’ची कारवाई

डोंंबिवली पश्चिमेतील गणेशनगर भागात राहणारे अनिल सुरवाडे (४०) शनिवारी दुपारी दीड वाजता आपली अडीच वर्षाची मुलगी ईरा हीला घेऊन कुंभारखाणपाडा खाडी किनारी भागात फिरण्यासाठी गेले होते. खाडी लगतच्या जेट्टीवर ईरा खेळत होती. वडील तिच्यापासून काही अंतरावर बसले होते. खेळताना ईराचा तोल जाऊन ती जेट्टीवरून खाडीत पडली. मुलगी पडली म्हणून वडील अनिल यांनी तात्काळ खाडीत उडी मारली. पाण्याचा वेगवान प्रवाह, दलदलीमुळे ते मुलीला वाचवू शकले नाही. मुलीला वाचविण्याचा प्रयत्नात वडील अनिल वाहून गेले. ही माहिती खाडी किनारी दूर अंतररावर असलेल्या दोन तरूणांना समजली. त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. अग्निशमन दल आणि पोलीस शनिवारपासून बपत्ता बाप, लेकीचा शोध घेत आहेत. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Story img Loader