डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावरील एका सोसायटीत राहत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याने याच सोसायटीत राहत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेची आठ लाख ७७ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. कर्जाऊ रक्कम परतफेडीसाठी पैसे द्या, एक वर्षाच्या आत गुंतवणूक दामदुप्पट करून देतो, या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली आहे. रश्मी सतीश कदम (६१) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील हिंदुस्थान बँकेच्या पाठीमागील एका सोसायटीत राहतात. विधीशा विलास कांदळगावकर (६६), विलास टी. कांदळगावकर (६७), सायली समीर काटे (३१, रा. विठ्ठलकृपा सोसायटी, मानपाडा रस्ता, डोंबिवली पूर्व) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

डिसेंबर २०१२ पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांदळगावकर दाम्पत्य आणि सायली काटे यांनी तक्रारदार रश्मी कदम यांना सांगितले की आम्ही काही रक्कम कर्जाऊ घेतली आहे. ती रक्कम आम्हाला परतफेड करायची आहे. यासाठी आपण आम्हाला सात लाख ९० हजार रूपये द्या, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला वाढीव परतावा देऊ. तसेच, आपण आम्ही सांगितलेल्या एका व्यापाऱ्याकडे पैसे गुंतवणूक केल्यास त्या गुंतवणुकीवर तुम्हाला दामदुप्पट रक्कम मिळेल, अशी बतावणी आरोपींनी केली. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन रश्मी यांनी त्यांना कर्जाऊ रक्कम परतफेडीसाठी सात लाख ९० हजार आणि वाढीव व्याज मिळेल या अपेक्षेने रश्मी यांनी आरोपी कांदळगावकर दाम्पत्य, सायली समीर काटे यांच्या ताब्यात दोन लाख ५१ हजार रूपये दिले.

terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
thieves stole jewellery from different parts of pune during diwali
लक्ष्मीपूजनाला सदनिकेतून दागिने लंपास- वारजे, लोणी काळभोर भागातील घटना
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा
police registered case against restaurant waiter for giving impure water
डोंबिवली पलावातील हॉलमधील सेवकावर अशुध्द पाणी पिण्यास दिले म्हणून गुन्हा
Financial and Cyber Crimes Branch reported that Deepak Sakharam Kulkarnis seized assets remain unreleased
जप्त केलेली कोणत्याही मालमत्ता मुक्त करण्यात आलेली नाही, डीएसके प्रकरणात आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेची न्यायालयास माहिती
dr ravindrakumar Singal
नागपूर पोलीस आयुक्तांच्याच नावे बनावट फेसबुक खाते
High Court denied interim relief to LIC on appointment of staff for assembly election work
सहमतीने घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांसाठी कुलिंग कालावधीची अट ठेवू नका, उच्च न्यायालयाची कौटुंबिक न्यायालयांना सूचना

हेही वाचा : ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता

तेरा वर्षाच्या कालावधीत सतत तगादा लावूनही आरोपींनी कर्ज रक्कम फेडण्यासाठी घेतलेली सात लाख ९० हजारामधील रक्कम परत करत नाहीत. तसेच वाढीव व्याज मिळवून देण्याच्या बोलीवर घेतलेले अडीच लाख रूपयांवर वाढीव व्याज नाहीच पण मूळ रक्कम आरोपी परत करत नव्हते. त्यामुळे रश्मी त्रस्त होत्या. विविध प्रकारची खोटी कारणे देऊन आरोपी मूळ रक्कम, वाढीव व्याज देण्यास टाळाटाळ करत होते. तेरा वर्ष उलटूनही आरोपी आपणास पैसे परत करत नाहीत. ते आपली फसवणूक करत आहेत, अशी खात्री पटल्यावर रश्मी कदम यांंनी शनिवारी या फसवणूक प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन लोखंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.