डोंबिवली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रतिष्ठेचा असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली नसली तरी शिवसेनेच्या वतीने श्रीकांत शिंदे यांच्या विविध विकासकामांचे होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत. ‘आमचं काम बोलतं’ या घोषवाक्यातून विविध कामे यातून दाखवण्यात आली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वैशाली राणे दरेकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर त्यांनी अनेकदा श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका किंवा प्रत्युत्तर न देता शिंदे यांनी अनुल्लेखाने टाळण्याचे ठरवल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता ‘आमचं काम बोलतं’ या प्रचार मोहिमातून विरोधकांना ही लोकसभा निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावरच लढवणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे दिसून येते आहे.
“आमचं काम बोलतं”, कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंची प्रचार मोहीम; शिळफाटा रस्त्यावर विविध विकास कामांचे होर्डींग
प्रचार मोहिमातून विरोधकांना ही लोकसभा निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावरच लढवणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे दिसून येते आहे.
Written by लोकसत्ता टीम
डोंबिवली
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-04-2024 at 15:08 IST
TOPICSठाणेThaneडॉ. श्रीकांत शिंदेडोंबिवलीDombivliमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
+ 1 More
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli shivsena mp shrikant shinde lok sabha campaign through hoardings on shilphata road css