लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: मागील काही दिवसांपासून डोंबिवली शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळेत वीज प्रवाह एक ते दीड तास खंडित होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला नसताना विजेचा प्रवाह खंडित होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Pimpri , Disaster Management, Japanese Technology ,
पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral
sonam wangchuck marathi news,
जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’

महावितरणचे अधिकारी याविषयी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. पाऊस सुरू झाल्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या वीज वाहिनीवर पडतात. कावळे वीज वाहिनीला चिकटतात, अनेक वेळा रोहित्राच्या ठिकाणी कार्बनचा थर तयार होतो. त्या ठिकाणी पावसाचे पाणी पडले की वीज प्रवाह खंडित होतो, असे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा… डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत कामगारांकडून चोरी

मागील तीन महिन्यांपासून नागरिक उकाड्याने हैराण आहेत. रात्रीच्या वेळेत वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर घरातील पंखे, वातानुकूलित यंत्र बंद पडतात. रात्रीच्या वेळेत घराबाहेर पडण्याची सोय नसते. दारे खिडक्या उघड्या ठेवल्यावर डास घरात येतात. त्यामुळे उकाडा सहन करत घरात बसून राहावे लागते, असे रहिवाशांनी सांगितले. बुधवारी रात्री डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर भागात दीड तास वीज पुरवठा बंद होता. असाच प्रकार पूर्व भागात सुरू आहे.

Story img Loader