डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीत महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्यांवर रिक्षा, दुचाकी वाहने दुरुस्त करणाऱ्या गॅरेजची दुकाने थाटली असून या दुकानांमुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डोंबिवली पश्चिमेत दररोज दोन ते तीन हजार रिक्षा पश्चिम रेल्वे स्थानक ते शहराच्या उमेशनगर, गणेशनगर, मोठागाव, देवीचापाडा, कोपर विस्तारीत भागात प्रवासी वाहतूक करतात. पश्चिमेतील बहुतांशी रस्त्यांची अवस्था खराब आहे. या रस्त्यांवरून वाहतूक करताना रिक्षांमध्ये बिघाड होतात. रिक्षांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रमाणात वाहन दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावर दत्त मंदिरासमोरील गल्लीजवळ, त्याच्या पुढील वळण भागात, रेतीबंदर चौक ते सम्राट चौकापर्यंत रेल्वे स्थानकाकडे जाताना रेतीबंदर चौकात पाच ते सहा दुकाने आहेत. सम्राट चौकाजवळ वर्दळीच्या अरुंद रस्त्यात वाहने उभी करून वाहनांची दुरुस्ती केली जाते. यामुळे सम्राट चौक भागात सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. देवीचापाडा गोपीनाथ चौकात रिक्षा वाहनतळाच्या समोर वर्दळीच्या रस्त्यात दुचाकी वाहन दुरुस्तीचे गॅरेज सुरू केले आहे. या चौकाला टपऱ्यांचा विळखा पडला आहे. म्हात्रे चौक ते दिवंगत प्रकाश गुलाब म्हात्रे चौकाच्या दरम्यान रस्त्यावर वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहेत.
हेही वाचा – चिखलोली स्थानकाच्या उभारणीला गती, फलाटाच्या निर्मितीसाठी ८१ कोटी ९३ लाखांची निविदा जाहीर
चौकांना टपऱ्यांचा विळखा
ह प्रभाग हद्दीतील गोपी माॅल चौक, सुभाष रस्त्यावरील चौक, रस्ते, गोपीनाथ चौक, महात्मा गांधी रस्ता, दिनदयाळ रस्ता या वर्दळीच्या रस्त्यांवर सकाळ, संध्याकाळच्या वेळेत पाणीपुरी, वडापाव, चायनिज विक्रीच्या हातगाड्या लावल्या जातात. या हातगाड्यांचे प्रमाण वाढल्याने परिसरातील सोसायट्यांमधील रहिवासी त्रस्त आहेत. गरीबाचापाडा येथील पालिका अग्निशमन केंद्रासमोर चामुंडा किराणा दुकानाच्या बाजूला एका जमीन मालकाने रस्ता, पदपथ अडवून तेथे लोखंडी मांडव रस्त्यात उभा केला आहे. याठिकाणी काही रहिवासी आपली वाहने उभी करून रस्ते, पदपथाची जागा हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. विजयनगर सोसायटी मैदानाजवळ काही चायनिज विक्रेत्यांनी पदपथ अडवून दुकाने थाटली आहेत.
हेही वाचा – डोंबिवली : अल्पवयीन दुचाकीस्वाराने दिली पादचाऱ्याला धडक, पादचारी जखमी
“ह प्रभाग हद्दीत फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जाते. ज्या रस्ते, चौकांमध्ये गॅरेज, हातगाड्या लावल्या जातात. त्यांच्यावर तातडीने नियोजन करून नियमितची कारवाई सुरू केली जाईल.” – स्नेहा कर्पे, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.