ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात सोमवारी सकाळी विद्युत वाहिन्या जळाल्याने या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. येथील विद्युत पुरवठा सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरळीत होणार असल्याचा संदेश नागरिकांना प्राप्त झाला आहे. परंतु येथील विद्युत पुरवठा त्यापूर्वीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कासारडवली भागात सोमवारी सकाळी काही तांत्रिक कारणांमुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिन्या आणि पर्यायी वाहिन्या जळाल्या. या प्रकारामुळे कासारवडवली येथील आनंदनगर, कासारवडवली परिसर, हावरे सिटी परिसर या भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. हा विद्युत पुरवठा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरळीत होईल असे संदेश नागरिकांच्या मोबाईलवर प्राप्त होत आहेत. पंरतु त्यापूर्वीच विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा… डोंबिवलीतील शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले. ऑक्टोबर महिन्यात सुरू असलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असताना, सकाळी विद्युत पुरवठा झाला. नोकरदारांनाही त्यांची कार्यालयीन कामे घरून करणे शक्य झाले नाही.