कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण ५४ स्फोटके (डिटोनेटर्स) कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेत. रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण पश्चिम फलाट क्रमांक एकवर दोन खोके आहेत. त्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगाराने कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले

हेही वाचा : कल्याणमधील सीटी पार्क फेब्रुवारीपर्यंत निशुल्क, १ मार्चपासून शुल्क आकारण्यास सुरुवात

तातडीने पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाच्या साहाय्याने या खोक्यांची तपासणी करण्यात आली. ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती. ती कोणी आणून ठेवली. स्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता, अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : ठाणे : रेल्वेगाडीत महिलेचे छायाचित्र काढून विनयभंग

खदानींमध्ये वापर

ही स्फोटके दगड खाणीच्या खदानींमध्ये सुरूंग स्फोटासाठी, विहिरी खोदण्यासाठी वापरली जातात, अशा क्षमतेची आहेत. या स्फोटकांचा तातडीने स्फोट होत नाही. ती डिटोनेटर्स जिलेटीन कांड्यांसारखी असतात. त्यांना वात असते. ती स्फोटकां शिवाय स्फोट करत नाहीत. तरीही ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणी आणली याचा तपास सुरू आहे, असे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. ही स्फोटके खरेदी करून एखादा व्यावसायिक कल्याण रेल्वे स्थानकात येऊन लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असावा. त्यावेळी पोलीस किंवा अन्य हालचालींमुळे त्याने स्फोटकांचे खोके तेथेच ठेऊन पळ काढला असावा, असाही तर्क पोलिसांकडून काढला जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan 54 detonators found outside the kalyan railway station police investigation started css