कल्याण: कल्याण रेल्वे स्थानका जवळील स्कायवाॅकवर राहत असलेल्या एक फिरस्ता गरोदर महिलेला शनिवारी रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या महिलेला कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने ‘येथे कर्मचारी नाही. तुम्ही दुसरीकडे घेऊन जा, अशी दुरुत्तरे दिली. दाखल करुन घेण्याच्या विषयावरुन पोलीस, रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये बोलाचाली सुरू असतानाच, संबंधित महिलेची रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात प्रसूती झाली.

रुग्णालय प्रशासनाने महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करुन घेतले असते तर तिच्यावर प्रवेशव्दारात प्रसूती होण्याची वेळ आली नसती. पोलीस या महिलेला तातडीने दाखल करुन घ्या. तिच्या प्रसूती वेदना वाढल्या आहेत, अशी विनवणी करुन रुग्णालय कर्मचाऱ्यांना सांगत होते. कर्मचारी आमच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, अशी उत्तरे देऊन दाराशी आलेल्या महिलेला दाखल करुन घेण्यास नकार देत होते. तिच्याकडे लक्ष देत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे पालिकेच्या रुग्णालय प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करत काही राजकीय मंडळींनी रुग्णालयात येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पोलीस पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना संपर्क साधत होते, पण कोणीही संपर्कात नसल्याचे पोलिसांना आढळले. पालिकेतील बहुतांशी अधिकारी वर्ग शासकीय सेवेतील आणि पुणे, ठाणे, नवी मुंबई भागात राहणार आहे.

complaint filed at Nagpur AIIMS against surgery head for harassing assistant professor
विभाग प्रमुखाकडून सहाय्यक प्राध्यापकाचा छळ… नागपूर एम्समध्ये…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप
suspect arrested for inciting girl doctor suicide
डॉक्टर तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणारा अटकेत; नवी मुंबईत सांगलीतील डॉक्टर ताब्यात
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
Ladki Bahin Yojana
Ladaki Bahin Yojana : “पुढच्या वेळी आईची मते मागू नका, तुमच्या…”, लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या कचरा वेचणाऱ्या महिलेचा संताप
Sameer Wankhede sister files defamation complaint against Nawab Malik Mumbai news
समीर वानखेडे यांच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात बदनामीची तक्रार; न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे आदेश
Two women fight at Ramnagar police station in Dombivli
डोंबिवलीत रामनगर पोलीस ठाण्यात दोन महिलांमध्ये केसाच्या झिंज्या उपटून मारामारी

ही मंडळी गंभीर परिस्थितीच्या वेळी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पोलिसांनी विनंती करुनही रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रसूती वेदन होत नसलेल्या महिलेला दाखल करुन घेतले जात नसेल तर, इतर सामान्य कुटुंबातील दाखल होण्यासाठी येणाऱ्या महिलांची काय अवस्था होत असेल, असे प्रश्न राजकीय कार्यकर्त्यांनी उपस्थित केले. पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयात सिझरिन, प्रसूृती वेदना होत असलेल्या महिलांना दाखल करुन घेतले जात नाही. त्यांना कळवा येथील छत्रपती रुग्णालयात किंवा रुग्णालयातील डाॅक्टर सांगेल त्या रुग्णालयात जाण्यास सांगितले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. संबंधित महिलेला पालिकेच्या वसंत व्हॅली येथील रुग्णालयात नेण्यासाठी रुक्मिणी बाई रुग्णालयात रुग्णवाहिकेची सोय केली होती. परंतु या महिलेला रुग्णवाहिकेत ठेवण्यापूर्वीच तिची प्रसूती झाली, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिले.

“रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती विभाग वसंत व्हॅली येथे स्थलांतरित केला आहे. या महिलेला तेथे जाण्याची सूचना कर्मचारी करत होते. त्यावेळेत महिलेची रुग्णालयाच्या दारात प्रसूती झाली. तिला डाॅक्टर, परिचारिकांनी तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात वैद्यकीय उपचार केले. आई, बाळ सुखरूप आहेत. तरीही ही घटना का घडली या प्रकराची चौकशी केली जाईल. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार केले जातात.” -डाॅ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी.

Story img Loader