कल्याण : कल्याण मधील संतोष बारमधील एका गायिकेला बुधवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान एका ग्राहकाने आपल्या जवळ बोलविले. गायिकेशी गैरकृत्य केले. या गायिकेने ग्राहकाला झिडकारताच त्याने मंचावरील मद्याची बाटली उचलून तिच्या दिशेने जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरानंतर बार मालकाने ग्राहक आणि त्याच्या साथीदाराला तेथून जाण्यास सांगितले. दोन्ही ग्राहकांनी बार मालकाला मारहाण केली. ठाणे येथे राहत असलेल्या गायिकेच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलिसांनी दोन ग्राहकांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मल्लेश मनी गौडा, समीर शिंदे अशी गुन्हा दाखल ग्राहकांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२४ वर्षाच्या गायिकेने महात्मा फुले पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, बुधवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान आपण कल्याणमधील संतोष बारमध्ये गायनाचे काम ग्राहकांसमोर करत होते. यावेळी समोर मल्लेश मनी गौडा ग्राहक म्हणून येऊन बसले. मल्लेश यांनी इशारा करून जवळ बोलावून घेतले. नवीन गाण्याची फर्माईश असेल म्हणून आपण मल्लेश यांच्या जवळ गेलो. त्यांना कोणते गाणे गाऊ अशी विचारणा केली. मल्लेश गौडा यांनी आपणास आईवरून शिवीगाळ करत ‘माझा फोन का उचलत नाहीस. मी तुला बाहेर भेटण्यास बोलवतो, तर तु येत नाहीस. तु या बारमध्ये कशी काम करते ते मी पाहतो,’ असे बोलून मल्लेश यांनी गायिकेशी गैरकृत्य करून त्यांचा विनयभंग केला.

हेही वाचा : कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात

मल्लेश यांनी हा प्रकार केल्याने गायिकेने त्यांचा हात रागात झटकला. त्या तेथून निघून जाऊ लागल्या. तेवढ्यात मल्लेशने समोरील मंचावरील मद्याची बाटली उचलून ती गायिकेला मारण्यासाठी मल्लेश तिच्या पाठीमागे जाऊ लागले. यावेळी अनर्थ होण्याची शक्यता असल्याने बारमधील सेवक आणि व्यवस्थापकांनी मध्ये पडून मल्लेश यांना अडविले. सेवक, व्यवस्थापकालाही मल्लेश यांनी शिवीगाळ केली.

हेही वाचा : एक धाव देशासाठी….युवा दौड संपन्न, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासचा उपक्रम

मल्लेश गौडा यांनी बारचे बाहेर जाऊन आपला सहकारी समीर शिंदे यांना बार जवळ बोलावून घेतले. ते दोघेही बारच्या बाहेर उभे राहून मोठ्या आवाजात शिवीगाळ करत होते. शांततेचा भंग होत असल्याने संतोष बारचे मालक देवराज पुजारी बार मधून बाहेर आले. त्यांनी दोघांना सामंजस्याने समजावून तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यावेळी मल्लेश आणि समीर यांनी मालक देवराज पुजारी यांनाही शिवीगाळ सुरू केली. ‘तुम्ही येथे कसा धंदा करता ते आम्ही बघतो. येथे धंदा करायचा असेल तर पहिले पैसे द्या, अन्यथा तुम्हाला मारून टाकू,’ अशी धमकी दिली. यावेळी दोघांनी मालक देवराज पुजारी यांनाही मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan bar owner beaten up by customers after attempt to hit bottle to female singer in bar css