कल्याण : राज्यातील सर्वाधिक कमी मतदान हे कल्याण मतदार संघात होत असल्याची खंत केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी घेतलेल्या एका निवडणूक विषयक आढावा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. त्यामुळे कल्याण, डोंबिवली परिसरातील मतदान वाढविण्यासाठीचे मोठे आव्हान स्थानिक प्रशासन, निवडणूक यंत्रणेवर होते. हे आव्हान पेलून स्थानिक पालिका, शासन प्रशासन यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यावेळी प्रथमच मतदानाचा टक्का ११ ते १५ टक्के वाढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागच्या २०१८, २०१९ या दोन सत्रांमध्ये विधानसभा निवडणुकीतील मतदान हे ४४ ते ४७ टक्क्यांपर्यंत स्थिरावले होते. यावेळी प्रथमच कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, या प्रशासनाचा शिक्षण विभाग, दहा प्रभागातील साहाय्यक आयुक्त, स्थानिक शासकीय यंत्रणा यांनी गेल्या दीड ते दोन महिन्यात कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी दैनंदिन विविध उपक्रम ठाणे जिल्हा मतदान वाढ प्रोत्साहन (स्वीप) समन्वयक अधिकारी, पालिका उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले.

हेही वाचा…कल्याण-डोंबिवलीत स्वयंस्फूर्तीने नागरिक मतदानासाठी रांगेत; बाचाबाचीच्या घटना, पोलिसांच्या तात्काळ मध्यस्थीने वादावर पडदा

गृहनिर्माण सोसायट्या, या संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक, स्वयंसेवी संस्था यांना मतदान जागृती प्रक्रियेत सामावून आपल्या संस्थेतील प्रत्येक सदस्यासह परिसरातील नागरिकांनी मतदान करावे यासाठी या संस्थांनी उपक्रम हाती घेतले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकारी विजय सरकटे यांनी शाळा, विद्यार्थी, पालकांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीचे उपक्रम राबविले. या मतदान जनजागृतीचा परिणाम इतका झाला की यावेळी प्रथमच गेल्या दहा वर्षानंतर प्रथमच कल्याण, डोंबिवलीतील चारही मतदारसंघातील टक्केवारी यावेळी ११ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. नागरिक सकाळी सात वाजल्यापासून मतदानासाठी स्वताहून बाहेर पडले होते. लोकसभा निवडणूक काळात कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सुमारे एक लाखाहून अधिक मतदारांना यादीत नाव नसल्याने मतदानाला मुकावे लागले होते. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर भाजप, शिवसेना, मनसे आणि इतर पक्षीयांनी खास मतदार नोंदणीसाठी आपल्या स्तरावर उपक्रम राबविले.

भाजपने डोंबिवलीत जून ते सप्टेंबर कालावधीत घरोघरी जाऊन मतदान नोंदणीची प्रक्रिया राबवली. निवडणूक विभाग, महसूल अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आणि सहकाऱ्यांनी समाज माध्यमातून मतदार जनजागृतीचे अनेक उपक्रम राबविले. मतदानाच्या दोन दिवस अगोदर मतदान यादीतील नाव, केंद्र, केंद्रापर्यंत मतदारांनी कसे जावे याविषयी साधेसोपे मार्ग संंकेतस्थळ, क्युआर कोडच्या माध्यमातून समाज माध्यमातून उपलब्ध दिले. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील ही मतदान टक्केवाढ आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.

हेही वाचा…मतदारांकडून बोटावरील शाई पुसट झाल्याच्या तक्रारी

गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये निवडणूक विभागाच्या आदेशाप्रमाणे मतदान जनजागृतीचे उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविले. मतदान करणे कसे राष्ट्रीय कर्तव्य आहे हे नागरिकांच्या मनावर बिंबवले. मतदारांच्या घरापर्यंत त्यांना मतदार यादीतील नाव ते मतदान केंद्राची माहिती दिली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे मतदान वाढ आहे.
संजय जाधव स्वीप समन्वय अधिकारी, ठाणे जिल्हा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan dombivli increased voter turnout by 11 to 15 percent sud 02