डोंबिवली : डोंबिवली, कल्याण ही शहरे राम नामाच्या गजराने दुमदुमून गेली आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सुट्टी असुनही सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या परिसरात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. जय श्रीरामाच्या घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात येत होत्या. मंदिर, शाळा, सार्वजनिक ठिकाणी राम उत्सवाच्या निमित्ताने आरती, गीत रामायण, राम लिलाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने कल्याण, डोंबिवली शहरात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. घरांसमोर रांगोळ्या, रामाची प्रतिमा असणारे भगवे झेंडे लावून भाविक आनंद व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा अभाव; मुंबई महानगरातील पालिकांची चार्जिंग स्थानके कागदावरच

कल्याण मधील सुभेदार वाड्या शेजारील ऐतिहासिक साठे वाड्यात रविवारी रात्री राम उत्सवाच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी कल्याणमध्ये राम उत्सवाच्या निमित्ताने भरगच्च कार्य्रक्रम आयोजित केले आहेत. कल्याण मधील शाळकरी मुलांच्या सकाळीच राम, सिता, वानरसेनेच्या वेशभुषेत मिरवणुका काढण्यात आल्या. डोंबिवलीत टिळकनगर शाळा, राधाबाई साठे, स. वा. जोशी, ब्लाॅसम, स्वामी विवेकानंद शाळांमध्ये रामोत्सवाच्या निमित्ताने आरतीचा कार्यक्रम आयोजित कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थी सकाळीच पारंपारिक पेहराव करून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हेही वाचा : डोंबिवलीत प्रभू श्रीरामाच्या दीप तेजाचा ” विश्वविक्रम”;  दिव्यांच्या माध्यमातून रेखाटलेली सर्वात मोठी चित्र रांगोळी

शहरातील दुकानांसमोर, रस्त्यावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. काही नागरिक रामाची वेषभुषा करून वावर करत आहेत. काहींनी हुनमानाचा पेहराव केला आहे. रस्तोरस्ती पारंपारिक पेहराव करून नागरिक वावर करत आहेत. रेल्वे स्थानके, बस स्थानकांमध्ये रंगीबेरंगी पेहरावातील प्रवासी दिसत आहेत. वाहनांच्या समोर रामाच्या प्रतिमा असलेल्या भगवे झेंडे लावून नागरिक प्रवास करत आहेत. नेहमीच्या नमस्कार, सुप्रभात ऐवजी जय श्री रामचा गजर करून एकमेकांना अलिंगन दिले जात आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; प्रेमप्रकरणातून घटना घडल्याचा पोलिसांना संशय

झोपडपट्टी, मंदिरे, शाळांच्या प्रवेशद्वार, बाजारपेठा, बाजार समितीच्या परिसरात राम भक्त लाडू, पेढे वाटपाचा कार्यक्रम करत आहेत. टोलेजंग इमारतींवर रामच्या प्रतिमा लावणारे उंच डौलदार झेंडे लावण्यात आले आहेत. डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकातील रिक्षांवर भगवे झेंडे लावण्यात आल्याने रेल्वे स्थानक परिसर भगवेमय झाले आहे. भाजप, शिवसेनेची पक्षीय कार्यालये विद्युत रोषणाई करून, भगवे झेंडे लावून सजविण्यात आली आहेत. घराघरांमधून ध्वनीमुद्रिकेवरील गीत रामायणाचे सूर उमटत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan dombivli school students celebrated shri ram temple opening ceremony ayodhya css
Show comments