कल्याण: लोकसभा निवडणूक कामासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस निवडणूक आयोगाने घेतल्याने या बसच्या माध्यमातून विविध शहरे, आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांचे मागील दोन दिवसांंपासून हाल सुरू आहेत. अनेक प्रवाशांनी दोन ते तीन महिने अगोदर एस. टी. बसचे गावी जाण्यासाठी आरक्षण करून ठेवले आहे. अशा प्रवाशांनाही बस वेळेवर उपलब्ध न होण्याचा फटका बसत आहे.

ठाणे, मुंबई पट्ट्यात सोमवारी, २० मे रोजी मतदान होत आहे. या निवडणूक कामासाठी खासगी, शालेय बस बरोबर राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसही निवडणूक कर्मचारी, सामान वाहतुकीसाठी घेण्यात आल्या आहेत. कल्याण, विठ्ठलवाडी, ठाणे, भिवंडी, शहापूर, मुरबाड बस आगारांमधील बस या कामांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगार व्यवस्थापकांना उपलब्ध बसच्या माध्यमातून स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या बस सोडाव्या लागत आहेत. या बस सोडताना आगार व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागते.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
st employees loksatta
एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या, परिवहन मंत्र्यांच्या घोषणेवर संघटना म्हणते…
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
new Maharashtra ST bus station at Shivajinagar will feature modern conveniences and design
शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट
Nivali-Haatkhamba villagers protest demanding cancellation of flyover at Nivali
निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा या मागणीसाठी निवळी-हातखंबा ग्रामस्थांचे आंदोलन

हेही वाचा : एक केळ जास्त घेतल्याने विक्रेत्यांचा ग्राहकांवर हल्ला

सोमवारी मतदान असल्याने ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी बस आगारातील बस शनिवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बस आगारांंमध्ये आता बसचा तुटवडा जाणवू लागला आहे. ते राष्ट्रीय काम असल्याने त्या बस आम्ही रोखू शकत नाही, असे एका आगार व्यवस्थापकाने सांगितले. आगारीतीलउपलब्ध बसचे योग्य नियोजन करून आम्ही प्रवासी वाहतुकीसाठी बस उपलब्ध करून देत आहोत, असे या व्यवस्थापकाने सांगितले.

प्रवाशांचे हाल

आगारामध्ये आरक्षण तिकीट अगोदर काढुनही बस प्रवासासाठी वेळेत उपलब्ध होत नसल्याने प्रवासी संतप्त आहेत. कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी भागातील काही प्रवाशांनी स्वारगेट (पुणे) येथे जाण्यासाठी रविवारच्या डोंबिवली-स्वारगेट शिवशाही वातानुकूलित बसमधील आसनाचे आरक्षण अगोदरच करून ठेवले होते. रविवारी सकाळी ९.०७ ला ही बस डोंबिवली एमआयडीसीतील बस आगारात येणे आवश्यक होते. या बससाठी प्रवासी साडे आठ वाजता डोंबिवली बस आगारात उपस्थित होते. परंतु, दोन तास झाले तरी ही बस डोंबिवली आगारात आली नाही. ही वातानुकूलित बस दुरूस्तीचे काम आगारात सुरू असल्याचे कारण प्रवाशांना देण्यात येत होते. त्यामुळे प्रवासी संंतप्त झाले होते.

हेही वाचा : मुंबईकरांनो, प्रवासात सोबत लॅपटॉप बाळगताय? मग कल्याण रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणीसोबत घडलेली ही घटना वाचा!

बस उशिरा धावत असल्याने या बसने कुटुंबासह प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ, वृध्द, लहान बाळे यांचे काहिलीने सर्वाधिक हैराण होत होती. प्रवाशांची सतत तगादा लावल्यानंतर अकरा वाजता डोंबिवली-स्वारगेट बस आली. इतर मार्गावर धावणाऱ्या फलटण, गाणगापूर, धुळे भागात जाणाऱ्या बसची हीच अवस्था असल्याचे प्रवाशांनी सांगितले. काही दिवसांपासून गावी जाणाऱ्या बस अनेक ठिकाणी अनियमित वेळेत सोडण्यात येत असल्याने प्रवाशांचा संताप होत आहे.

हेही वाचा : बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

स्वारगेट बस बंद

डोंबिवलीत उशिरा आलेली कल्याण-स्वारगेट बस पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ गेल्यावर बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला म्हणून बंद पडली. या बसमधील एसी बंद पडला. प्रवासी काहिलीने हैराण झाले. अखेर पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये सोयीप्रमाणे प्रवाशांना पाठविण्यात आले.

Story img Loader