कल्याण : आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक बोली भाषेत शिकवले तर ते लवकर लक्षात राहते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम बोजड किंवा अवघड वाटत नाही. मुले अभ्यासात रमून शाळा न सोडण्याकडे त्यांचा कल वाढतो. हा विचार करून शासनाने शहापूर परिसरासह दुर्गम आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिली ते चौथीपर्यंतचा पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम स्थानिक मातृभाषेतून शिकवण्यास सुरूवात केली आहे.

आदिवासी भागातील मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिकवल्यास शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना एखादा विषय समजून सांगणे अवघड जात नाही. आदिवासी मुलांना बोली भाषेतून शिकवण्याची पालकांची मागणी होती. ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीत भाषेतून धडे देण्यास शिक्षकांनी सुरूवात केली आहे. पहिली ते चौथीपर्यंतची पाठ्यपुस्तके स्थानिक मातृभाषेत केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार रुपांतरीत करण्यात आली आहेत. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने बालभारतीच्या क्रमिक पुस्तकाचे आदिवासींच्या बोलीभाषेत रुपांतरण केले आहे.

art festival organized by Nukkad Cafe BhagyaShali Bhavishya Shiksha Foundation for slum children in Pune
प्रतिकूल वास्तवात राहूनही ‘त्यां’चे भविष्य ‘त्यां’नी असे बघितले…! झोपडपट्टीतील मुलांसाठी आयोजित कला महोत्सवात कल्पनेच्या भरारीचे अनोखे दर्शन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Nagpur At AIIMS traditional healers showcased herbal medicines and medicinal plants from Gadchiroli and remote areas
‘आदिवासींच्या गावात’ वनऔषधींचा खजाना… नागपूर ‘एम्स’मध्ये…
response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
Ministry of Skill Development launched skill courses in local languages now available in Marathi as well
कौशल्य विकासाचे धडे आता मातृभाषेतून; एनसीडीसीकडून मराठीमध्ये सुविधा
Primary school student names 120 talukas in one and a half minutes
प्राथमिक शाळेच्या व्हिडिओला पाच कोटींवर व्ह्यूज, विद्यार्थी दीड मिनिटांत सांगतो १२० तालुक्यांची नावे…
maharashtra navnirman sena demand to use marathi language in bank of maharashtra
महाबँकेत मराठी भाषेचा वापर करा, का केली मनसेने ही मागणी ?
birth certificate Rohingya Bangladeshi Tehsildar, Naib Tehsildar Malegaon
रोहिंगे, बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा ठपका; मालेगावचे तहसीलदार,नायब तहसीलदार निलंबित

हेही वाचा : सुट्टी नसल्यामुळे जवळच्या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यास तरुणांची पसंती; कर्जत, लोणावळा, माथेरान मधील शेतघरांमध्ये आगाऊ नोंदणी

शहापूर तालुक्यात आदिवासी समाज अधिक आहे. येथे हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. शहापूर तालुक्याच्या आदिवासी भागात ठाकर, वारली, कातकरी, कोळी, कोकणा, पावरी भाषेचा वापर केला जातो. आदिवासी पट्ट्यातील बहुतांशी मुले स्थानिक आश्रमशाळांमध्ये निवासी पध्दतीने शिक्षण घेतात. या मुलांना यापूर्वी नियमितच्या क्रमिक अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षण दिले जात होते. आदिवासी मुलांच्या बोली भाषेचा विचार करता त्यांना मराठीतून शिक्षणाचे धडे गिरवताना अडचणी येत असल्याच्या शिक्षकांच्या निदर्शनास येत होते. आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे आदिवासी बोली भाषेत रुपांतर करण्यात आले आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमधील मोठा अडथळा दूर झाला, अशा प्रतिक्रिया आश्रमशाळांमधील शिक्षकांकडून देण्यात येत आहेत. नियमितच्या अभ्यासक्रमातील भाषा आदिवासी विद्यार्थ्यांना बोजड वाटत होती. अभ्यासाची ग्रहण क्षमता नसल्याने काही विद्यार्थी अभ्यासात मागे पडत होते. ही दरी आता दूर होणार आहे, असे शिक्षकांनी सांगितले.

हेही वाचा : कळवा, मुंब्रा, दिव्यासह ठाण्याच्या काही भागांत गुरूवारी पाणी नाही, एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार

आदिवासी आश्रमशाळा

शहापूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या ३६ आश्रमशाळा आहेत. यात १३ अनुदानित, २३ शासकीय आश्रमशाळा आहेत. १४ हजार ५०० आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चौथीपर्यंत तीन हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

आश्रमशाळांमध्ये चौथीपर्यंतची बोली भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उर्वरित पुस्तके लवकरच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.

बी. आर. जाधव (साहाय्यक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग)

आदिवासी मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिकवण्यात येते. विद्यार्थ्यांना विषय समजणे सोपे होत आहे. शाळेत मला काही समजत नाही, ही विद्यार्थ्यांची अडचण आता दूर झाली.

अनंत विशे (मुख्याध्यापक, अघई)

Story img Loader