कल्याण: येथील पश्चिमेतील आधारवाडी भागातील व्हर्टेक्स हाऊसिंग सोसायटीतील पंधराव्या माळ्यावरील सदनिकेला मंगळवारी संध्याकाळी भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. आगीमुळे पंधराव्या, सोळाव्या माळ्यावरील काही सदनिका खाक झाल्या. लगतच्या चौदाव्या माळ्यावरील सदनिकांनाही आगीची झळ बसली.

कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु, अतिशय उंचावर लागलेली आग, तेथपर्यंत उच्चदाबाने पाणी मारण्यात जवानांना अनेक अडथळे येत होते. मध्यमवर्गियांची वस्ती म्हणून व्हर्टेक्स गृहसंकुल ओळखले जाते. मंगळवारी संध्याकाळी या संकुलाच्या पंधराव्या माळ्यावरील सदनिकेला आग लागली. शहराबाहेर हे संकुल असल्याने वाऱ्याच्या वेगाने आग भडकत गेली.

thane granthotsav loksatta news
साहित्यप्रेमींसाठी ” ठाणे ग्रंथोत्सव २०२४ ” चे आयोजन, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, चांगदेव काळे यांची उपस्थिती
Police keep an eye on rave parties before New Year Eve thane news
नववर्ष स्वागतापूर्वी पोलीस यंत्रणा सतर्क; रेव्ह पार्ट्यांवरही पोलिसांचे…
badlapur sexual assault case
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर पुन्हा हादरलं! मैत्रिणीने मद्य पाजले, मग रिक्षाचालकाने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार
unseasonal rain in dolkhamb area of shahapur
शहापूर तालुक्यातील डोळखांब भागात अवकाळी पाऊस
Akhilesh Shukla police custody, Marathi family case Kalyan, attack on Marathi family case,
अखिलेश शुक्ला यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, कल्याणमधील मराठी कुटुंबीयांना मारहाण प्रकरण
Government Hospital of Ulhasnagar, intensive care unit,
उल्हासनगरचे शासकीय रुग्णालय पुन्हा अंधारात, अतिदक्षता विभाग सोडून उर्वरित रुग्णालयात वीज नाही
drug Navi Mumbai, Navi Mumbai, drug related crimes,
नवी मुंबईला अमली पदार्थांचा विळखा
young woman cheated for 14 lakh 50 thousand at place where she bought medicine online
३४ हजाराच्या औषधांसाठी १४ लाख गमावले
General Conference , Cooperative Housing Societies ,
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशनाला सुरुवात, महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थेशी संबंधित विविध प्रदर्शन तसेच मार्गदर्शन

हेही वाचा : ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन

पंधराव्या माळ्यावरील आग सोळाव्या माळ्यापर्यंत पोहचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझविण्याचे काम सुरू असताना काही घरातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. आग लागलेल्या इमारतीमधील रहिवाशांनी उद्वाहन, जिन्याने जमिनीवर येणे पसंत केले.

आग सोळाव्या माळ्यापर्यंत पोहचली. तेथेपर्यंत उच्चतम दाबाने पाणी मारा करणारे कडोंमपाचे वाहन तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याने ठाणे महापालिका, बदलापूर नगरपालिकेची अत्याधुनिक यंत्रणेची अग्निशमन वाहने पाचारण करण्यात आली. घटनास्थळी पाच अग्निशमन बंद, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका सज्ज होत्या. आगीत जीवित हानी झाली आहे का, कोणी अडकले आहे का हे पाहण्यासाठी पालिका, पोलिसांकडून ड्रोनचा वापर करण्यात आला. आगीत जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. वित्त हानी अधिक प्रमाणात झाली आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत मतदानासाठी उभारलेल्या मंडपांचा वाहतुकीला अडथळा

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्यासह इतर पालिका अधिकारी घटनास्थळी हजर होते. वीस माळ्याहून अधिक मजल्यांवर आग लागली तर ती आग विझविण्यासाठी ७० मीटर हायड्रोलिक वाहन खरेदी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे आयुक्त डाॅ. जाखड यांनी सांगितले.

इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसविल्यानंतर त्याची वेळच्या वेळी सोसायट्यांकडून देखभाल केली जात नाही. सदनिका सजावटीच्या नावाखाली ही यंत्रणा घर सजावटकाराकडून झाकली जाते. त्यामुळे आग लागल्यानंतर ही यंत्रणा जवानांना लवकर सापडत नसल्याच्या तक्रारी उपस्थितांनी केल्या.
आग कशामुळे लागली हे निश्चित नसले तरी शाॅर्ट सर्किटमुळेच आग लागली असण्याची शक्यता अग्निशमन यंत्रणांनी व्यक्त केली.

Story img Loader