कल्याण : कल्याण पश्चिमेतील एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप भाजपचे तत्कालीन माजी नगरसेवकासह इतर पाच जणांवर झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तीन वर्षापूर्वी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार संघटित गुन्हेगारीचा असल्याने पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याची (मोक्का) कलमे मारेकऱ्यांवर लावून त्यांच्यावर विशेष मोक्का न्यायालयात खटला दाखल केला होता. मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमित शेटे यांनी या गुन्ह्याच्या सर्व बाजू ऐकून घेऊन सबळ पुराव्यांअभावी या प्रकरणातील सर्व संशयित मारेकऱ्यांची मोक्का आरोपातून मुक्तता केली आहे.

मोक्का न्यायालयाने बाळा सुरेश पोकल उर्फ सतेज (३१), माजी भाजप नगरसेवक सचिन समसान खेमा (४५), नितीन समसान खेमा (४२), प्रेम हरिभाऊ चौधरी (३४), बब्लू माजिद शेख उर्फ तोहीत (२५), गणेश विलास रोकडे (३०) यांची मोक्का आरोपातून निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणात मारेकऱ्यांतर्फे ॲड. पुनित माहिमकर, ॲड. सागर कोल्हे, सरकार पक्षातर्फे ॲड. एस. बी. मोरे यांनी काम पाहिले.

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News LIVE Updates : वाल्मिक कराडवर मकोका लागला असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक – जरांगे पाटील
Kalyan-Dombivli Municipal corporation,
महाराष्ट्रातून कोठूनही पाहता येणार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
varun patil bjp kalyan
भाजपचे कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरूण पाटील यांची हकालपट्टी
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : ठाण्यातील नागरिकांना घडणार सिंधु संस्कृतीचे दर्शन, जोशी-बेडेकर महाविद्यालयात साकारले सिंधु संकृतीचे प्रदर्शन

या प्रकरणाची मोक्का न्यायालयाच्या निर्णयातील माहिती अशी की, अमजद सय्यद कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करतात. अमजद यांचा मित्र भूषण यांनी एका वादातून माजी नगरसेवक सचिन खेमा यांच्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अमजद, भूषण, चेतन आणि हर्ष हाॅटेल सत्कार येथे एकत्र आले होते. तेथे सचिन आणि नितीन खेमा, सतेज पोकल आले. नितीन यांनी भूषणला सचिन विरुध्द दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितली. न घेतल्यास बघून घेऊ असे बोलून ते निघून गेले होते. या प्रकारानंतर त्याच दिवशी मध्यरात्री सचिन खेमा अमजद यांना मोबाईलवर सारखे संपर्क करत होते. त्यांना अमजद प्रतिसाद देत नव्हते. नितीन, सतेज, प्रेम आणि बब्लू रात्रीच अमजद यांच्या घरी पोहचले. त्यांनी सचिन खेमाचे फोन का उचलत नाहीस असा प्रश्न केला. सचिन खेमाला भेटण्यास चल असे सांगितले. स्टेशन भागात व्यवसाय करायचा असेल तर पाच लाखाची खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी केल्याची अमजद यांची तक्रार होती.

हेही वाचा : महाराष्ट्रातून कोठूनही पाहता येणार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या

अमजद यांनी घडल्याप्रकाराबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. आपल्या साथीदारांसह पोलीस ठाण्यात जात असताना वाटेत मारेकऱ्यांनी अमजद यांच्यासह सहकाऱ्यांवर शस्त्राने हल्ला केला. पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्याने कारवाई केली होती. पोलीस तपासात अनेक त्रृटी असल्याने सबळ पुराव्यांंअभावी न्यायालयाने मारेकऱ्यांची मोक्का आरोपातून मुक्तता केली.

Story img Loader