कल्याण : ठाणे-कल्याण आणि डोंबिवली हा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी माणकोली पुलावर उभारण्यात येणाऱ्या खाडी पूलाच्या दिशेने येजा करण्यासाठी सोयीचे ठरावे यासाठी मुंबई-नाशीक महामार्गावर भुयारी मार्ग काढण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. मुंबई, नाशिक येथून येणाऱ्या वाहनांसाठी मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर माणकोली येथे हा वळण भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. महामार्गावरुन माणकोली पुलावर जाण्यासाठी स्वतंत्र्य मार्गिका उपलब्ध होणार असल्याने याठिकाणी होणारी कोंडी टळेल असा दावा केला जात आहे. शिवाय हा प्रवास आणखी वेगाने करण्याच्या दृष्टीने ही आखणी केली जात आहे. हा भुयारी मार्ग बांधण्यासाठी ५७ कोटी रुपयांचा खर्च ठरविण्यात आला आहे.

मुंबईतून मोठागाव माणकोली पुलावर येणाऱ्या आणि डोंबिवलीतून मुंबई, नाशिक येथे जाणाऱ्या माणकोली गावा जवळ मुंबई-नाशिक-आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर गोलाकार वाहतूक बेट तयार होणार आहे. हा विचार करून प्राधिकरणाने या महामार्गाजवळ भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन केले आहे. याच कामाचा एक भाग म्हणून डोंबिवली बाजूकडील माणकोली पूल ते मोठागाव, रेतीबंदर फाटक पोहच रस्त्यांची कामेही केली जाणार आहे. तसेच या प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या भुयारी मार्गासाठी मुंबई-नाशिक महामार्ग येथे येणाऱ्या वाढीव खर्चाचा विचार करून तो उभारु नये असा निर्णय यापुर्वी घेण्यात आला होता.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात वर्षभरात सव्वा दोन लाख वाहनांची नोंदणी

माणकोली खाडी पूलाचे काम संपुष्टात आले आहे. हा खाडी मार्ग ठाणे-कल्याण, डोंबिवली यासारख्या शहरा दरम्यान वाहतुकीसाठी महत्वाचा ठरणार आहे. शीळ-कल्याण मागार्वर दररोज मोठी कोंडी होत असते. या नव्या मार्गामुळे या मार्गावर वाहनांचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे महानगर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या रस्ते मार्गाची पाहणी केली. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्यंतरी माणकोली पुलावर येजा करण्यासाठी महामार्गावरुन स्वतंत्र्य मार्गिका असावी असा आग्रह धरला होता. यामुळे महामार्गावरील प्रवासही खंडीत होणार नाही आणि या मार्गिकेमुळे कोंडी होणार नाही अशा सूचना पुढे आल्या होत्या. हे लक्षात घेऊन महामार्गास लगत हा भुयारी मार्ग काढला जाणार आहे.

हेही वाचा : घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरण ठाणे, परिसरासाठी महत्त्वाचे का? भविष्यात कोणते फायदे अपेक्षित?

भुयारी मार्गाचा लाभ

मुंबई-ठाणे मार्गे डोंबिवली माणकोली पूल येथे मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गाने येणारी वाहने माणकोली भागात डोंबिवलीकडे उजवे वळण घेत असताना नाशिककडून येणारी वाहने बाधित होणार होती. तसेच नाशिककडून महामार्गाने माणकोली गाव येथून माणकोली पुलाकडे येणाऱ्या वाहनांना पोहच रस्त्यावर येण्यासाठी वळण मार्गाची आवश्यकता होती. महामार्गावरील या वाहनांच्या गुंत्यामुळे याठिकाणी भुयारी मार्ग बांधला नाही तर भविष्यात याठिकाणी नियमित वाहन कोंडी होईल, असा विचार पुढे आला. महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनीही मध्यंतरी या भागाची पहाणी केली होती. अखेर महामार्गावर भुयारी वळण मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवलीतून माणकोली पुलावरून मुंबई, नाशिककडे महामार्गाने जाणारी वाहने या भुयारी मार्गातून राष्ट्रीय महामार्गाला संलग्न होऊन प्रवास सुरू करणार आहेत.

हेही वाचा : ठाणे : भरारी पथकांची निष्क्रियता वाळू माफियांच्या पथ्यावर, जिल्ह्यात सर्वत्र दिवस रात्र अवैध वाळू उपसा

रस्त्यासाठी १६० कोटी मंजूर

माणकोली मोठागाव रस्त्याच्या १६० कोटीच्या सुधारित अंदाजित खर्चासाठी प्राधिकरणाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर माणकोली गाव हद्दीत ठाणे पालिकेची व स्टेम वाॅटर वितरण कंपनीची जलवाहिनी बाधित होणार होती. नवीन जलवाहिनीची कामे पूल प्राधिकरणाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला. ठाणे पालिकेकडून अडीच हजार चौरस मीटर व्यासाच्या जलवाहिनींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

सुरू असलेली कामे

माणकोली पुलाच्या डोंंबिवली बाजूकडील उतार टिटवाळा आणि डोंबिवलीत जाणाऱ्या वळण रस्त्याची कामे प्रस्तावित आहेत. दुर्गाडी ते मोठागाव वळण रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. रेतीबंदर रेल्वे फाटकावर उड्डाण पुलाचे काम प्रस्तावित आहे.

Story img Loader