कल्याण : महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता येथील खडकपाडा भागातील स्प्रिंग टाईम क्लबमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या कल्याण, डोंबिवली भागातील पदाधिकाऱ्यांनी या सभेचे आयोजन केले आहे. जुडेगा भारत-जितेगा इंडिया, या महाविकास आघाडीच्या शीर्षकाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आ. रोहित पवार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
हेही वाचा : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचेही घरच्या घरी विसर्जन शक्य, अंबरनाथ पालिकेच्या मदतीने रोटरी क्लबचा नवा प्रयोग
आगामी निवडणुकांचा पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्व आहे. कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मरगळ आलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना उभारी देण्याचा प्रयत्न या सभेच्या माध्यमातून केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश नेते महेश तपासे, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, डाॅ. वंडार पाटील, सारिका गायकवाड, सुधीर पाटील, नंदू मालवणकर, संगीता मोरे, सुनीता देशमुख, आसिफ मिर्झा, इमरान खान आणि इतर कार्यकर्त्यांच्या नियोजनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.