कल्याण : डोंबिवली जवळील खोणीगाव तळोजा रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री एका मोटार कार चालकाने एका दुचाकी स्वाराला जोराची धडक देऊन त्याला जखमी केले. दुचाकी स्वार रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडला होता. त्याला एका पादचाऱ्याने एका गॅरेजच्या निवाऱ्याजवळ बसविले. आणि जखमी प्रवाशाची दुचाकी त्या पादचाऱ्याने घेऊन पळून गेला. जखमी प्रवाशी शुध्दीवर आला तेव्हा त्याला आपली दुचाकी गायब असल्याचे दिसले. आपणास मदत करणाऱ्या इसमानेच दुचाकी चोरून नेली असल्याचा संशय व्यक्त करून जखमीने मानपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली आहे.

उमेशकुमार पारसमल दुक्कड (३५) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. ते डोंबिवली जवळील लोढा आर्केड गृहसंकुलात राहतात. पोलिसांंनी सांगितले, तक्रारदार उमेशकुमार हे गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तळोजा खोणी रस्त्याने दुचाकीवरून जात होते. यावेळी सुसाट वेगात असलेल्या एका मोटार कार चालकाने उमेशकुमार यांच्या दुचाकीला जोराने कट मारला. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात उमेशकुमार यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ते बाजुच्या खड्ड्यात दुचाकीसह पडले.

हेही वाचा : टिटवाळ्यात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू, फळेगाव-उतणे गावांमधील शेतकऱ्यांमध्ये वाद

मोटार कार चालक यावेळी पळून गेला होता. बराच उशीर उमेशकुमार मध्यरात्रीच्या वेळेत रस्त्याच्याकडेला पडून होता. त्याचवेळी तेथून एक पादचारी पायी जात होता. त्याने जखमी उमेशला मदत करण्याच्या बाहाण्याने त्याला प्रथमोपचार करून बाजुला असलेल्या एका गॅरेजच्या निवाऱ्याखाली आणून बसविले. पादचारी आपणास साहाय्य करत आहे. एवढ्या रात्रीत आपल्याला कोणीतरी मदत करण्यास पुढे आला आहे म्हणून उमेशकुमारने समाधान व्यक्त केले होते.

हेही वाचा : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाणे, भिवंडीत वाहतूक बदल

पादचारी आपली दुचाकी सुस्थितीत करून आपल्या जवळ आणून उभी करील असे तक्रारदाराला वाटले. उमेशकुमार बेसावाधपणे रस्त्यावर पडल्याने अस्वस्थ होते. तेवढ्यात पादचाऱ्याने रस्त्याच्याकडेला पडलेली दुचाकी सुस्थितीत करून रस्त्यावर आणली. त्याने ती चालू करून बघण्याचा प्रयत्न केला. दुचाकी चालू झाली. ती सुस्थितीत असल्याचे पादचाऱ्याला दिसले. पादचारी दुचाकी आपल्याजवळ आणून उभी करील असे उमेशकुमार यांना वाटले. तेवढ्यात पादचाऱ्याने दुचाकी सुरू करून उमेशकुमारला अंधारात ठेऊन दुचाकीसह पळून गेला. बराच उशिराने उमेशकुमारला आपली दुचाकी पादचाऱ्याने पळून नेल्याचे जाणवले. एवढ्या मध्यरात्री कोणाची मदत घेणार या विचाराने उेमेशकुमारने दुचाकी स्वाराच्या मागे धावणे टाळले. मध्यरात्रीच मानपाडा पोलीस ठाणे गाठून दुचाकी चोरीची आणि अज्ञात मोटार कार चालकाची तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. पाटील तपास करत आहेत. रात्रीच्या वेळेत काटई-बदलापूल पाईप लाईन रस्ता, खोणी-तळोजा रस्त्यावर लुटारूंच्या टोळ्या फिरत असतात. अनेक प्रवाशांना यापूर्वी लुटण्यात आले आहे.

Story img Loader