कल्याण – शिधावाटप कार्यालयात अधिकारी आणि ग्राहक यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या एका शिधावाटप मध्यस्थाला चार जणांनी लाथाबुक्की आणि लोखंडी सळईने बेदम बुधवारी मारहाण केली आहे. या मारहाणीत मध्यस्थाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी दुपारी मुरबाड रस्त्यावरील प्रशांत हाॅटेलच्या समोर हा प्रकार घडला. क्रिश चाळके आणि त्याचे तीन साथीदार या प्रकरणात आरोपी आहेत. तुषार शशिकांत आहेर (३५) असे शिधावाटप मध्यस्थाचे नाव आहे. ते रामबाग भागात राहतात. तुषार यांनी या मारहाण प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा – नयानगरच्या घटनेनंतर ठाणे पोलीस सतर्क, समाजमाध्यमावर धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा – कल्याण : स्वच्छता अभियानातील निधीची उधळपट्टी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी रोखली

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार तुषार आहेर हे शिधापत्रिका तयार करण्याचे काम ग्राहकांकडून घेतात. असेच काम तुषार यांनी आरोपी क्रिश चाळके यांच्याकडून घेतले होते. अनेक दिवस उलटले तरी तुषार नवीन शिधापत्रिका देत नाहीत म्हणून आरोपी क्रिश संतप्त झाले होते. बुधवारी संध्याकाळी तुषार आहेर मुरबाड रस्त्याने पायी चालले होते. तेथे क्रिश चाळके आपल्या तीन साथीदारांच्या बरोबर आला. त्याने तुषार यांना शिवीगाळ करत शिधापत्रिका वेळेत देता येत नसेल तर कशाला लोकांची कामे करायला घेता. का लोकांना फसवता, असे प्रश्न करून तुषार यांना क्रीश आणि त्याच्या साथीदारांंनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी जवळील लोखंडी सळई तुषार यांच्या डोक्यावर मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. हवालदार के. पी. कामडी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan ration distribution mediator was beaten with an iron rod ssb