कल्याण – आम्हाला कल्याण जवळील शहाड येथील बिर्ला मंदिरात देवदर्शनासाठी जायचे आहे. दर्शनानंतर थेट आम्हाला ठाणे येथ जायचे आहे, असे सांगून प्रवासी म्हणून रिक्षात बसून चालकाला गुंगीचे औषध टाकलेला प्रसादाचा पेढा देऊन त्याला गुंगी आली की त्याच्या जवळील रोख रक्कम, हातामधील अंगठ्या, रिक्षा घेऊन पसार होण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून डोंबिवली, कल्याणमध्ये वाढले आहेत. अशाप्रकारे लुटीच्या कल्याणमध्ये दोन, डोंबिवलीत एक घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील समतानगर पोखरण रस्ता क्रमांक एक भागात राहणारे रिक्षा चालक संजय रसाळ (५२) यांना गेल्या महिन्यात दोन व्यक्ती संध्याकाळच्या वेळेत प्रवासी म्हणून भेटले. त्यांनी संजय यांना आम्हाला शहाड येथील बिर्ला मंदिरात दर्शन घेऊन तात्काळ ठाणे येथे निघायचे आहे. तुमचे असेल ते भाडे आम्ही देतो, असे सांगून चालक रसाळ यांच्या रिक्षेत दोन प्रवासी बसले. बिर्ला मंदिरात दर्शन घेऊन दोन्ही प्रवासी पुन्हा रसाळ यांच्या रिक्षेत बसून ठाण्याला जाण्यासाठी बसले. शहाड रेल्वे स्थानक परिसर सोडताच एका प्रवाशाने आपणास लघुशंका करायची आहे, रिक्षा मोहने रस्त्याला आडबाजूला घे, असे सांगितले. रसाळ यांनी मोहने रस्त्याला रिक्षा घेताच एका प्रवाशाने गुंगीचे औषध टाकलेला पेढा रसाळ यांना खाण्यास दिला. तो खाताच त्यांना काही क्षणात गुंगी आली. त्या संधीचा गैरफायदा घेत रिक्षातील दोन्ही भामट्यांनी रसाळ यांना खाली उतरवून त्यांच्या ताब्यातील रिक्षा घेऊन ते पसार झाले. शहाड येथील मराठे एलेन्झा इमारतीसमोर ही घटना घडली. शुद्धीत आल्यावर चालक रसाळ यांना दोन प्रवाशांनी लुटल्याचे समजले. खडकपाडा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली आहे.

हेही वाचा – तुम्ही पाण्यात बुडणारे दगड; मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

हेही वाचा – राहुल गांधी यांच्या निषेधार्थ डोंबिवलीत ब्राह्मण महासंघाकडून फलकबाजी

असाच दुसरा प्रकार ठाण्यातील सावरकरनगर भागातील आत्माराम दळवी (६८) या रिक्षा चालकाच्या बाबतीत घडला आहे. त्यांनाही शहाड येथे आणून दोनजणांनी त्यांना गुंगीचे औषध टाकलेला पेढा खाण्यास देऊन त्यांची रिक्षा, रोख रक्कम असा ९४ हजारांचा ऐवज भामट्यांनी लुटून नेला. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत पाच अनोळखी व्यक्तींनी डोंबिवलीतील घरडा सर्कल चौकात राजन चौधरी (२३, रा. गोवंडी) या ओला वाहन चालकाला दोन दिवसांपूर्वी लुटले. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan rickshaw driver robbed ssb
Show comments