कल्याण : भाजपने महायुतीच्या उमेदवार म्हणून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीमुळे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याचा निर्णय सोमवारी कल्याण पूर्व शिवसेना मध्यवर्ति कार्यालयातील एका बैठकीत घेतला.

सुलभा गायकवाड यांची उमेदवारी म्हणजे आमच्यासाठी काळा दिवस आहे, अशा भावना शिवसेनेच्या नगरसेवकांनी व्यक्त केल्या. माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे समर्थक शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यापासून कल्याण पूर्वेत भाजप-शिवसेनेतील दरी रुंदावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी ही दरी काही प्रमाणात बुजविण्याचा प्रयत्न केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ही दरी पुन्हा रुंदीवली आहे.

Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Conflict in Mahayuti over post of Guardian Minister of Raigad aditi tatkare bharat gogawale
रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत संघर्ष
Two arrested in Solapur for vandalizing ST bus
एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
Fake WhatsApp of Mira Bhayandar Municipal Commissioner crime news
मिरा भाईंदर पालिका आयुक्तांचे बनावट व्हॉट्सअप; अधिकाऱ्यांकडेच पैशांची मागणी
dr Babasaheb Ambedkar amit shah
अमित शहांना आंबेडकर ‘फॅशन’च वाटणार!

हेही वाचा : मुरबाडमधून सुभाष पवारांची बंडखोरी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश, उमेदवारीवरही शिक्कामोर्तब

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, अन्यथा एकही शिवसैनिक महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. महिला, पुरूष कार्यकर्ते अधिक संख्येने यावेळी उपस्थित होते. ज्या व्यक्तिने कल्याण पूर्वेचा पंधरा वर्षात विकास केला नाही, त्याच व्यक्तिच्या घरात पुन्हा उमेदवारी देऊन भाजपने काय साध्य केले आहे, असे प्रश्न शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केले.

या मतदारसंघात उमेदवार बदलला नाहीतर बंडखोर उमेदवार उभा केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक इच्छुक उमेदवार नीलेश शिंदे, महेश गायकवाड, विशाल पावशे, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : क‌ळवा-मुंब्र्यात अजित पवार गटाला धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांची शरद पवार गटात वापसी

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ विकास न झाल्याने भकास झाला आहे. या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणारा आणि दूरदृष्टीचा कार्यक्षम उमेदवार या मतदारसंघात देणे आवश्यक होते. भाजपने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देऊन मतदारांशी प्रतारणा केली आहे. कल्याण पूर्वेत शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्यामुळे योग्यवेळी त्या ताकदीचा आम्ही आता वापर करू.

महेश गायकवाड (शहरप्रमुख, शिवसेना)

मी २०१९ ला उमेदवारी मागितली होती, त्यावेळी पक्षाने उमेदवारी दिली नाही. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. कल्याण पूर्वचा विकास करायचा आहे. पक्ष प्रमुखांना आम्ही अनेकवेळा सांगितले पण ऐकले नाही. त्यामुळे आम्ही बंडखोरीच्या पवित्र्यात आहोत.

नीलेश शिंदे (माजी नगरसेवक, शिवसेना)

Story img Loader