कल्याण: कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील कल्याण डोंबिवली पालिकेच्या बगिचा सुविधेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांचे लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या परवानग्या घेऊन लोकसभा निवडणूक जनसंपर्क कार्यालय थाटले होते. आरक्षित भूखंडावरील हे कार्यालय सुरू ठेवण्यास पालिकेची ६ जूनपर्यंत मुदत होती. ही मुदत उलटुनही हे कार्यालया राखीव भूखंडावर थाटात उभे असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

पालिकेच्या विकास आराखड्यातील उद्यान, बगिचे हे सुविधा भूखंड परिसरातील नागरिकांसाठी राखीव असतात. या भूखंडावर कोणालाही कसल्याही प्रकारचे तात्पुरते, पक्के बांधकाम करण्यास पालिका प्रशासन परवानगी देत नाही. मात्र, शिवसेना खासदार डाॅ. शिंदे यांच्या दबावामुळे पालिका अधिकाऱ्यांंनी शिवसेनेला कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील प्रसाद हाॅटेल शेजारील बगिचासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर (आरक्षण क्र. ४५०) लोकसभा निवडणूक कार्यालय थाटण्यास परवानगी दिली होती. या परवानगीच्या बदल्यात आवश्यक ते शुल्क पालिकेने शिवसेना पदाधिकाऱ्यांंकडून भरून घेतले होते.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
loksatta chandani chowkatun Delhi University Priyanka Gandhi Vadra Maharashtra Assembly Elections BJP Jagdeep Dhankhar
चांदणी चौकातून: ‘दुसू’त काँग्रेस!
subhash dhote loksatta news
पोस्टल मतदानात काँग्रेस आघाडीवर मात्र, ईव्हीएमवर भाजप… काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे म्हणतात, “बाऊंसर लावून पैसे वाटप”

हेही वाचा: डोंबिवलीतील सागाव येथील नोकरदाराची सतरा लाखाची फसवणूक

आरक्षित भूखंडावरील हे कार्यालय प्रशस्त पत्रे, ताडपत्र्यांनी बांधलेले आणि वातानुकूलित आहे. लोकसभा निवडणूक कालावधीत शिवसेनेच्या या कार्यालयात सभा, बैठकांसाठी पदाधिकाऱ्यांची वर्दळ असायची. निवडणुकीनंतर या कार्यालयात प्रचाराचे फलक, झेंडे, निवडणूक विषयक साहित्य आणून ठेवण्यात आले आहे.

मोक्याच्या जागी असलेले हे कार्यालय हातचे जाऊ नये म्हणून शिंदे गटाचे शिवसैनिक आग्रही होते. अखेर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करून आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांचा विचार करून हे कार्यालय जैसे थे ठेवण्यासाठी, या कार्यालयाची ६ जूनची मुदत पालिकेकडून वाढून मागण्याची सूचना केली.

हेही वाचा: घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्प वादात, घोडबंदरवासियांचा प्रकल्पास विरोध

राखीव भूखंड निवडणूक कार्यालयासाठी भाड्याने देण्याची तरतूद पालिका कायद्यात आहे का, याविषयी पालिका अधिकारी मूग गिळून आहेत. बगिचा आरक्षणावरील हे कच्चे बांधकाम हळूहळू हडप केले जाण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. याविषयी काही राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत.

शासन योजना कार्यालय

मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांंनी जाहीर केलेली लाडकी बहिण योजना आणि इतर शासकीय योजनांच्या प्रचार कार्यक्रमांंसाठी आता या राखीव भूखंडावरील शिवसेना कार्यालयाचा उपयोग केला जात आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

आपण जे प्रभागात काम करतो. आपल्या प्रभागात असे बगिचा आरक्षण भूखंडावर कोठेही लोकसभा निवडणूक कार्यालय नाही.

सविता हिले (साहाय्यक आयुक्त, जे प्रभाग. कल्याण)

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरे लवकरच सीसीटीव्हीच्या कक्षेत ! सीसीटीव्ही यंत्रणेच्या ४९२ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता

प्रसाद हाॅटेलजवळील भूखंडावर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी पालिकेच्या परवानग्या घेऊन निवडणूक कार्यालय उघडले होते. आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांचा विचार करून हे कार्यालय सुरू ठेवण्याच्या परवानगीची मुदत वाढवून ते आहे तसे ठेवण्याचे खासदार डाॅ. श्रीकांंत शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे मदत वाढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

रमाकांत देवळेकर (उपजिल्हाप्रमुख, कल्याण)

Story img Loader