डोंबिवली: कल्याण ग्रामीण २७ गाव भागातील शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश गोविंद म्हात्रे यांची गुरुवारी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केली. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हकालपट्टी करण्यात आल्याने ग्रामीण शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

शिंदे शिवसेना पक्षाच्या विरोधात प्रकाश म्हात्रे कल्याण ग्रामीण भागात काम करत असल्याचा ठपका जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पत्रात ठेवला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रकाश म्हात्रे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. ते जिल्हा परिषद सदस्य होते. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. कल्याण ग्रामीण पट्ट्यात आनंद दिघे यांच्या कार्यकाळात गावोगावी शिवसेना शाखा काढण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. कल्याण ग्रामीण भागावर हुकमत असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…

हेही वाचा : ठाणे पोलिसांनो २३ नोव्हेंबर नंतर सरकार कोणाचे येतेय, याची वाट बघा जितेंद्र आव्हाडांचा ठाणे पोलीसांना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर प्रकाश म्हात्रे यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहणे पसंत केले होते. त्यांनी शिंदे शिवसेनेत यावे म्हणून त्यांना विविध प्रकारे त्रास देण्यात आला होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर संस्थान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

लोकसभा निवडणूक काळात प्रकाश म्हात्रे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रकाश म्हात्रे विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण भागात शिवसेना विरोधी काम करत असल्याच्या तक्रारी शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांकडे गेल्या होत्या. त्यांची वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे जिल्हाप्रमुख लांडगे यांनी सांगितले.

कल्याण ग्रामीण विधानसभेसाठी डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांना शिंदे शिवसेनेने उमेदवारी दिल्याने स्थानिक काही शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. ग्रामीण भागात शिवसेनेत तगडे उमेदवार असताना बाहेरील उमेदवार आमच्यावर का लादता असा प्रश्न स्थानिक शिवसैनिक करत आहेत. यापूर्वी असाच निर्णय पाच वर्षापूर्वी शिवसेनेने घेऊन कल्याण ग्रामीणमध्ये ज्येष्ठ शिवसैनिक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी स्थानिकांनी बाहेरील उमेदवार येथे नको अशी आक्रमक भूमिका घेऊन म्हात्रे यांच्या विरोधात काम केले होते. तोच विषय आता पुन्हा उफाळून आला असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यातही नामसाधर्म्याची खेळी; चार मतदारसंघात मुख्य उमेदवारांच्या नावांशी साम्य असलेले उमेदवार रिंगणात

जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनीच तुमच्या मनाला वाटेल तसे काम करा, असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही त्या पध्दतीने काम करत होतो. मी कधीच शिंदे शिवसेनेचा सदस्य नव्हतो. मी लिखित स्वरुपात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य आहे. लांडगे यांना माझी हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही. लांडगे यांनी आम्हाला अधिक तोंड उघडण्यास लावू नये अन्यथा सगळे गुऱ्हाळ बाहेर येईल.

प्रकाश गोविंद म्हात्रे (शिवसैनिक)

वरिष्ठांच्या आदेशावरून मी ही कारवाई केली आहे. मी त्यांना पक्ष विरोधी काम करा असे कधीही सांगितले नाही. यापूर्वीच मी त्यांना पक्षाशी निष्ठावान राहा. संशयास्पद वातावरण स्वताभोवती निर्माण करू नका, एकाच भूमिकेवर ठाम राहा असे सांगितले होते. पक्षात राहून विरोधी काम करतात ते गद्दार.

गोपाळ लांडगे (जिल्हाप्रमुख, शिवसेना)

Story img Loader