लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : क्रिकेट स्पर्धा महाविद्यालयाच्या आहेत. आरोपी हा महाविद्यालयात विद्यार्थी नसताना, तो दुसऱ्या गटाकडून का क्रिकेट खेळत आहे, असा प्रश्न एका तरूणाने उपस्थित केला. या वादातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बनावट महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून खेळणाऱ्या तरुणाने बेदम मारहाण केली.

गेल्या महिन्यात हा प्रकार कल्याण मधील सुभाष मैदानात घडला होता. तक्रारदार विद्यार्थी रुग्णालयात उपचार घेत असल्याने तक्रारदार दाखल करण्यास उशीर झाला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तक्रारदार सिद्धांत उल्हाळकर (१९), आरोपी धीरज देवरे (२०) हे कल्याण पश्चिमेतील जोशी बागेतील हंसाबाई निवासमध्ये शेजारी राहतात. गेल्या महिन्यात तक्रारदार सिद्धांत महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाच्या क्रिकेट स्पर्धा सुभाष मैदानात होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थी या स्पर्धेत आमने सामने खेळत होते.

आणखी वाचा-“महाराज खरंच येऊन बघा… गुंड चाकू, सुरे, कोयते, तलवारी…”, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पत्र

आरोपी धीरज देवरे हा तृतीय वर्ष वाणीज्य शाखेचा विद्यार्थी नसताना, तो सामनेवाला गटाकडून विद्यार्थी म्हणून खेळत होता. धीरज हा आपल्या महाविद्यालयात तृतीय वर्ष वाणीज्य वर्गात विद्यार्थी नाही. तरी तो सामनेवाला गटाकडून कसा खेळतो, असा प्रश्न तक्रारदार सिध्दांत याने मैदानात उपस्थित करून धीरजच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केले. या गोष्टीचा आरोपी धीरज देवरेला राग आला. त्याने रागाच्या भरात हाताचे ठोशे सिध्दांतच्या श्रीमुखात मारले. त्याच्या नाक, डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार करण्यात आले. मारहाणीत सिद्धांतला गंभीर दुखापत झाल्याने त्याने धीरज विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. के. रुपवते तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan student beaten for playing cricket mrj
Show comments