लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: टिटवाळ्या जवळ बल्याणी गावात राहणाऱ्या पतीला पत्नीच्या तीन भावांनी शहाड जवळील बंदरपाडा भागात बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. त्याला रायते गावाजवळील उल्हास नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीला आला.

widow marriage news marathi
बुलढाणा : दिराने विधवा वहिनीचे लग्न जुळविले…पित्याच्या भूमिकेत कन्यादानही केले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Prateik Babbar second marriage date out
स्मिता पाटील यांचा मुलगा करतोय दुसरं लग्न, प्रतीकच्या लग्नाची तारीख आली समोर; होणारी पत्नी कोण? वाचा…
gadchiroli tribal couple
मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा; आदिवासी दाम्पत्याची व्यथा, तीन दिवसांपासून उपाशी, पत्नीचे मंगळसूत्र मोडले
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Santosh Deshmukh sister Priyanka chaudhari
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश, बहिणीला अश्रू अनावर; म्हणाल्या, “माझा भाऊ राजा होता, त्याने आम्हाला…”

शेहबाज शेख (२८) असे मयत व्यक्तिचे नाव आहे. शहाबाजची पत्नी मुमताज हिने खडकपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी पती गायब असल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. अग्निशमन जवानांनी उल्हास नदीत शहाबाजचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी इरशाद शेख, शोहेब शेख, हेमंत बिचवाडे यांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, शहाबाज आणि घटस्फोटीत मुमताज चार वर्षापासून एकत्र राहतात. त्यांना जुळी मुले आहेत. पहिल्या पतीपासून मुमताजला तीन मुले आहेत. घरगुती कारणावरुन शेहबाज-मुमताज यांच्यात वाद होते. मुमताज मुलांसह माहेरी गेली होती. शुक्रवारी सकाळी शेहाबाजने आईला मी नमाज पडायला जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला. तो पत्नीच्या बंदरपाडा भागातील घरी गेला. तेथे त्याचे पत्नी मुमताज बरोबर कडाक्याचे भांडण झाले.

हेही वाचा… पलावा चौकातील उड्डाण पुलावर तुळई ठेवण्यासाठी शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक बुधवारपासून सहा दिवस अन्य मार्गाने

शहाबाजने तेथून बाहेर पडताना एका मुलाला सोबत घेऊन तो घरी येऊ लागला. मुमताजचा भाऊ शोहेब शेख याने मुलाल शहाबाजच्या हातामधून हिसकावून त्याला पुन्हा घरात आणले. यावेळी शोहेब, इरशाद शेख हे मुमताजचे दोन भाऊ आणि त्यांचा साथीदार हेमंत बिचवाडे यांनी शेहबाजला बेदम मारहाण करुन त्याची हातोडीने हत्या केली. त्याला जबरदस्तीने रिक्षेत टाकून त्याला रायते गावाजवळ उल्हास नदी किनारी नेले. तेथे त्याला नदीत फेकून देण्यात आले.

हेही वाचा… अंबरनाथ, बदलापुरात बिबट्यांच्या नावे अफवांचा संचार, समाज माध्यमात नाशिकची चित्रफीत प्रसारित, वन विभागाचा खुलासा

मुमताजने या प्रकाराची माहिती खडकपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन घडल्या प्रकाराबाबत माहिती विचारणा केली. त्यांनी शेहबाजची हत्या करुन उल्हास नदीत फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मुमताजच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. बेपत्ता शेहाबाजचा जवान नदीत तपास करत आहेत.

Story img Loader