कल्याण : कल्याण जवळील अटाळी गावात किंग आणि भावड्या या बैलांच्या मालकांनी रविवारी सकाळी अटाळी गावातील गुरचरणीच्या मोकळ्या जागेत आपल्या लाडक्या बैलांच्या झुंजी लावल्या. आपल्या बैलाला जिंकविण्यासाठी दोन्ही मालकांनी हरतऱ्हेची मेहनत घेतली. जिंकण्याच्या चढाओढीत दोन्ही बैलांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. बैल मालकांची हौस आणि निष्काळजीपणातून हा प्रकार घडल्याने खडकपाडा पोलिसांनी दोन्ही बैल मालकांवर प्राण्यांना निर्दयपणे वागविणे प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र नामदेव पाटील (५४), हेमंत राम पाटील (२३) या दोन बैल मालकांविरूध्द खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या आदेशावरून हवालदार राजू लोखंडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान अटाळी गावातील कालिका माता मंदिराच्या मागील गुरचरण जागेत बैल मालक नरेंद्र पाटील यांनी आपल्या किंग बैलास प्रतिस्पर्धी बैल मालक हेमंत पाटील यांच्या भावड्या बैलाबरोबर झुंजविले आहे. या झुंजीत दोन्ही बैलांना जखमा झाल्या आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली.

हेही वाचा : ठाण्यातील खासगी डाॅक्टर देणार पालिका रुग्णालयात सेवा

पोलिसांच्या पथकाने अटाळी गावात जाऊन गावात बैलांच्या झुंजी कोणी आयोजित केल्या होत्या याची माहिती काढली. नामदेव, हेमंत यांनी आपल्या बैलांना झुंजविले असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी नरेंद्र, हेमंत यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी दोघांनी बैलांच्या झुंजी लावल्याची कबुली दिली. पोलिसांनी किंग आणि भावड्या बैलाची पाहणी केली. त्यावेळी एक बैलाच्या कपाळाला तर एकाच्या मानेवर धारदार शिंगे लागल्याचे पोलिसांना दिसले.

हेही वाचा : ट्रक टर्मिनल उभारणीसाठी वेगवान हालचाली; ठाणे शहराच्या वेशीवर उभारले जाणार ट्रक टर्मिनल

या दोन्ही बैल मालकांनी प्राण्यांना निर्दयीपणे वागवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला म्हणून खडकपाडा पोलिसांनी बैल मालकांविरूध्द गुन्हा दाखल केला. या बैलांवर घरगुती पध्दतीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत, असे बैल मालकांनी सांगितले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यापासून पुन्हा बैलांच्या शर्यती, बैलांच्या झुंजी हे प्रकार राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. यामध्ये बैलांना खूप अमानुषपणे मारले जाते, असे प्राणीमित्रांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan two bulls seriously injured in bull fight at atali village css
Show comments