कल्याण : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता असावी म्हणून येथील बाजारपेठ या संवेदनशील भागात पोलीस तैनात करण्यात आले होते. तरीही या भागात सोमवारी दोन समाजाच्या गटात वादाचे प्रसंग निर्माण होऊन परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. या प्रकरणाला जबाबदार धरून वरिष्ठांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना निलंबित केले आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरू असताना कल्याणमध्ये २० जणांचा एक जमाव दुचाकीने दुर्गाडी किल्ला भागातून गोविंदवाडी पूल भागातून जात होता. त्यावेळी या भागातून काही अज्ञात इसमांनी दुचाकीच्या दिशेने दगडफेक केली. यावरून या भागात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : भाजपची आता राम यात्रा, महाराष्ट्रातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी

त्याचवेळी संवेदनशील भागात जाऊन अन्य समाजाच्या एका जमावाने धार्मिक तेढ निर्माण होईल अशा घोषणा दिल्या. शिवीगाळ करत तेथे काही वेळ घालविला. रस्ता बंद असताना ४५ जणांच्या जमावाने कल्याण मधील संवेदनशील भागात वातावरण तणावपूर्ण केले. याप्रकरणी एका धर्मस्थळाच्या व्यवस्थापकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत व्यापारी गाळ्यावरून भाजप ग्रामीण महिला अध्यक्षा सुहासिनी राणे यांना मारहाण

बाजारपेठ पोलीस ठाणे परिसर संवेदनशील असताना या भागात पोलीस तैनात असताना या घटना घडल्या आहेत. बंदोबस्तावरील पोलीस ही परिस्थि्ती तात्काळ आटोक्यात आणू न शकल्याने वरिष्ठांनी या भागात तैनात दोन पोलिसांना निलंबित केले असल्याचे समजते. अधिक माहितीसाठी साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांना संपर्क केला. त्यांनी नंतर बोलतो सांगून माहिती देण्यास नकार दिला आणि मोबाईल बंद केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan two police suspended due to clashes at bajarpeth area on ram temple consecration ceremony css