कल्याण : येथील ज्येष्ठ गायक गिरीश नारायण जोशी (५७) यांच्या दुचाकीची मागील दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक रस्त्यावर एका हाॅटेल समोर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. गायक जोशी यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, गायक गिरीश जोशी हे कल्याण पश्चिमेतील गुरूदेव हाॅटेल जवळील शिवाजी पथावरील एका सोसायटीत राहतात. गेल्या रविवारी रात्री त्यांनी आपली हिरो स्पेलंडर दुचाकी हाॅटेल सत्कार समोरील सार्वजनिक रस्त्यावर उभी करून ठेवली होती. या दुचाकीवर पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळेत दुचाकी चोरून नेली. तीस हजार रूपये किंमतीची ही दुचाकी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ठाण्यात आता निसर्ग वाचनालयांची उभारणी, ठाणे महापालिकेचा उपक्रम

सोमवारी सकाळी बाहेर जाण्यासाठी गायक जोशी दुचाकी जवळ आले. त्यावेळी त्यांना दुचाकी जागेवर नसल्याचे दिसले. त्यांनी परिसरात शोध घेतला. तरीही त्यांना दुचाकी आढळून आली नाही. दुचाकीची चोरी झाल्याची खात्री पटल्यावर जोशी यांनी बुधवारी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कल्याण, डोंबिवली घरफोडी, वाहन चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक हैराण आहेत. शहरातील एवढे चोऱ्यांचे प्रमाण कधीच नव्हते, असे जुने जाणते सांगतात. कल्याण परिमंडळाला खमक्या उपायुक्त देण्याची मा्गणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान यांच्यावर दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यामुळे नागरिक सर्वाधिक संतप्त आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan two wheeler of singer girish joshi stolen css