कल्याण- कल्याण पश्चिमेतील जोशीबाग भागात सोमवारी संध्याकाळी एका धोकादायक इमारतीचा काही भाग लगतच्या चाळीवर कोसळला. यामुळे चाळीतील दोन महिला जखमी झाल्या आहेत.इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी तातडीने कोसळलेला मलबा बाजूला करून नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा केला.

जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.जोशी बाग मध्ये पालिकेने घोषित केलेली एक धोकादायक इमारत आहे. या इमारतीच्या वर निवारा शेड आहे. या इमारतीमुळे धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Story img Loader