कल्याण : येथील पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील आदर्श शाळेच्या पुढे भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकी स्वाराने निष्काळजीपणाने दुचाकी चालवून एका ५३ वर्षाच्या पादचाऱ्याला जोराची धडक दिली. या धडकेत पादचाऱ्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राॅबर्ट डिझोझा असे गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. दुचाकी स्वाराला राॅबर्ट डिसोझा आपल्या चुकीमुळे जखमी झाले आहेत हे माहिती असुनही त्यांना कोणतीही मदत न करता अपघात स्थळावरून निघून गेला. संतोषी माता रस्त्यावरील आदर्श शाळेच्या पुढे एलजी शोरुमच्या समोर हा अपघात घडला. याप्रकरणी राॅबर्ट डिसोझा यांनी दुचाकी स्वाराविरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

हेही वाचा…कल्याण पूर्वेत रस्तोरस्तीच्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी

महात्मा फुले पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील माहिती अशी की, तक्रारदार राॅबर्ड डिसोझा गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान आपल्या चिकणघर येथील घरातून निघून संतोषी माता रस्त्याने जुनी एच. डी. एफ. सी. बँक शेजारील औषध दुकानात औषध खरेदीसाठी आले होते. औषध खरेदी करून ते पुन्हा पायी घरी चालले होते. एल. जी. शोरुम समोरून जात असताना पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकी स्वाराने भरधाव वेगात हयगयीने, निष्काळजीपणाने दुचाकी चालवली. चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने दुचाकीची राॅबर्ट यांना जोराची धडक दिली. या धडकेमुळे तक्रारदार जमिनीवर पडले. त्यांच्या हात, पाय, खांद्या, चेहऱ्याला ला गंभीर दुखापत झाली. यावेळी राॅबर्ट यांना वैद्यकीय मदतीसाठी साहाय्य करण्याऐवजी दुचाकी स्वार घटनास्थळावरून निघून गेला. हवालदार खरात याप्रकरणाचा तपास करत आहेत. अपघात घडल्या ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलीस दुचाकी स्वाराचा शोध घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan west speeding bike rider hit 53 year old pedestrian sud 02