कल्याण: कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांबा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई मधील एक प्रवासी आणि त्याचे दोन मित्र वाशी बसमध्ये चढत होते. यावेळी तीन भामट्यांनी बसमध्ये चढत असताना हुल्लडबाजी करून एका प्रवाशा बरोबर वाद घालून त्याच्या जवळील १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून गेले.

आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण पश्चिमेतील बस आगारात प्रवाशांजवळील वस्तू चोरणे, आगारा बाहेरील प्रवाशांच्या हातामधील वस्तू लुटून नेण्याचे प्रकार घडत होते. हे प्रकार आता वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांब्यावर सुरू झाल्याने प्रवाशांनी विशेषता महिला प्रवाशांनी धसका घेतला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्या वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

pune traffic jam issue
वाहतुकीचे तीनतेरा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
ST buses Amravati scrap , passengers Amravati ST bus,
अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
Mumbai Local Train Shocking Video viral
मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुणाचा धिंगाणा, महिलांसमोर थुंकला अन् हातवारे करुन…; पाहा धक्कादायक VIDEO
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण

हेही वाचा : कल्याणमधील शहाड, रामबाग परिसराचा पाणी पुरवठा रात्रीपासून बंद

पोलिसांनी सांगितले, हेतराज प्रजापती (२२) हे कल्याणमध्ये नोकरी करतात. ते नवी मुंबईतील सानपाडा भागात राहतात. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार हेतराज आणि त्यांचे दोन साथीदार वल्लीपीर रस्त्यावरील वाशी बस थांब्यावरील नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या वाशी बसमध्ये चढत होते. बसमध्ये चढत असताना तीन भामट्यांनी हेतराज यांच्याशी बसमध्ये चढताना धक्काबुक्की का केली, असे बोलत भांडण उकरून काढले. तिघे मिळून हेतराज यांना दमदाटी करू लागले. हेतराज त्यांना समंजसपणे सांगत असताना, ते दादागिरीची भाषा करत होते.

हेही वाचा : Kalyan Crime News : “पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल..”; चिठ्ठी लिहित कल्याणच्या शाळकरी मुलाने आयुष्य संपवलं

तिन्ही भामटे चोरी, प्रवाशाला लुटण्याच्या उद्देशाने बसमध्ये चढले होते. हेतराज यांच्याशी बाचाबाची केल्यानंतर एका भामट्याने हेतराज यांच्या हातामधील मोबाईल हिसकावला. तो परत देण्याची मागणी हेतराज करू लागले तेव्हा ते तिघे भामटे बसमधून उतरून पळून गेले. हेतराज यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हवालदार पी. एल. साळुंखे तपास करत आहेत.

Story img Loader