कल्याण : आपण नपुंसक आहोत हे माहिती असूनही पतीने ही माहिती आपणास विवाहापूर्वी दिली नाही. आपल्याशी विवाह करून आपणास शरीर सुखापासून वंचित ठेवले, अशी तक्रार एका विवाहितीने कल्याण मधील आपल्या पती विरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ३२ वर्षाची विवाहिता असलेली तक्रारदार महिला शहापूर परिसरातील दुर्गम भागात राहणारी आहे. नातेवाईकांच्या ओळखीतून या महिलेचा विवाह कल्याण मधील शहाड येथील एका ४० वर्षाच्या तरूणा बरोबर गेल्या वर्षी जून मध्ये झाला होता. विवाहापूर्वी विवाहितेच्या नातेवाईकांनी तुम्ही विवाहासाठी ४० वर्ष होऊन सुध्दा का थांबले असे विचारले तेव्हा त्यावेळी आरोपी पतीने आपण सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होतो म्हणून आपणास विवाहास विलंब झाला, असे कारण दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवाहितीने मुलगा शिकलेला आहे म्हणून त्याला पसंत केले. मुलाने मुलीला पसंत केले. या दोघांचा विवाह मोठ्या थाटात नाशिक जवळील इगतपुरी भागात पार पडला होता. विवाहानंतर पती विक्षिप्तपणे वागत असल्याचे तक्रारदार विवाहितेला आढळले. तिने पतीला भावनिक नात्याद्दल समजून सांगितले. परंतु पतीमध्ये काही दोष आहेत हे तक्रारदार विवाहितेला निदर्शनास आले. ती सुरूवातीला अस्वस्थ होती. या अस्वस्थेतमधून विवाहिता माहेरी निघून गेली.

हेही वाचा…कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

परंतू पती, सासरच्या मंडळींच्या आग्रहामुळे ती परत माहेरी आली. तिला पतीमधील भावनिक दोष प्रकर्षाने दिसून आले. घरात असताना पतीच्या पिशवीत तो डॉक्टरांकडून काही औषधे घेत असल्याचे आढळले. तिने गुपचूप संबंधित डॉक्टरकडे जाऊन विचारणा केली. त्यावेळी डॉक्टरने पती मध्ये काही भावनिक दोष आहेत. त्यासाठी ते हे औषधे घेत असल्याचे सांगितले. पतीकडून आपणास कधीही शरीरसुख मिळणार नाही याची खात्री पटल्यावर विवाहितीने पतीने आपली नपुसंक आहोत हे माहिती असुनही विश्वासघात, फसवणूक केली आहे, अशी तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. घस्ते प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan wife filed complaint against her husband accusing him of being impotent psg