कल्याण : अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरातील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण येथील एक सेवानिवृत्त शिक्षिक आणि लेखिका मंजिरी मधुकर फडके यांना श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे देण्यात आले आहे. देशाच्या विविध भागातील मोजक्या निमंत्रितांना या सोहळ्यासाठी आयोजकांकडून निमंत्रित केले जात आहे. या सोहळ्यासाठी कल्याणमधील एका शिक्षिकेला निमंत्रित करण्यात आल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील अनेक रामभक्त अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु याठिकाणी निमंत्रितांनाच प्रवेश असल्याने या मंडळींनी स्थानिक पातळीवरून ध्वनीदृकश्राव्य माध्यमातून या सोहळ्याचा आनंद लुटण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागातील रस्ते, चौकांमध्ये या सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यासाठी काही राजकीय मंडळी, धर्माभिमानी संस्था पुढाकार घेत आहेत.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत बनावट बांधकाम मंजुऱ्यांद्वारे ८७ बेकायदा इमारतींची उभारणी, नगररचना विभागाच्या अभिलेखातून माहिती उघड

ही जय्यत तयारी सुरू असतानाच कल्याण मधील ज्येष्ठ शिक्षिका मंजिरी फडके यांना या सोहळ्याचे निमंत्रण श्री राम जन्मभूमी ट्रस्टतर्फे देण्यात आल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे सात हजार भाविकांना विशेष निमंत्रित म्हणून निमंत्रण आहे. श्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या प्रतिनिधींनी गुरूवारी सकाळी फडके यांच्या कल्याण मधील घरी जाऊन त्यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. मंजिरी फडके या श्रीमदभगवत गीतेच्या साधक म्हणून चाळीस वर्षापासून कार्यरत आहेत. त्या आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी आहेत. संत वाडमय, अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी लेखन केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan writer manjiri phadke invited for ayodhya ram temple opening ceremony css
Show comments