कल्याण : कल्याण पूर्व आय प्रभागात पालिकेच्या परवानग्या न घेता वाढदिवसांच्या शुभेच्छा, गृहसंकुले, व्यापार विषयक जाहिरातींचे फलक लावून शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेते, नागरिक, व्यापाऱ्यांचे रस्त्यांवरील जाहिरात फलक आय प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडून टाकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक ठिकाणी लोखंडी सांगाड्यावर फलक लावून ठराविक राजकीय जाहिरातील तेथे लावल्या जात होत्या. त्या ठिकाणचे लोखंडी सांगाडे गॅस कटरच्या साहाय्याने कापून काढण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखालील तोडकाम पथकाने ही कारवाई केली. ६० हून अधिक बेकायदा फलक रस्त्यांवरून काढून टाकण्यात आले. व्दारली गाव हद्दीत श्री गायकवाड नावाने २० फूट लांबी रूंदीचे फलक अनेक दिवसांपासून लावण्यात आले होते. तो फलक गॅस कटरच्या साहाय्याने पथकाने कापून काढला.

हेही वाचा… कल्याण-तळोजा मेट्रोने दररोज अडीच लाख प्रवाशांची वाहतूक

या कारवाईच्या वेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते. अनेक राजकीय मंडळी आपला नेते, पदाधिकारी, स्वताचे वाढदिवस असले की पालिकेच्या परवानग्या न घेता शुभेच्छांचे फलक लावतात. अनेक दिवस हे फलक रस्त्यावर झळकत असतात. या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण आणि पालिकेचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे ही आक्रमक कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे नियमबाह्य फलक लावणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले.

हेही वाचा… ठाणे : महिन्याभरासाठी घोडबंदर मार्गावर मध्यरात्री वाहतूक बदल

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने डोंबिवलीत मानपाडा ते शिळफाटा रस्त्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा राजकीय नेते, पदाधिकारी यांचे फलक गेल्या शनिवारपासून झळकत आहेत. या फलकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kdmc authorities take action on illegal hoardings warning to file defacement offence asj