लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: डोंबिवली जवळील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकाच्या काही भागात फलाटावर निवारा नाही. त्यामुळे ऊन, पावसापासून संरक्षणासाठी प्रवासी जिन्याचा आधार घेत आहेत. मुसळधार पाऊस सुरू असेल तर शटल पकडताना प्रवाशांना पावसात भिजत जावे लागते.

कर्जत, कसारा परिसरातून येणारे भिवंडी, वसई, विरार, डहाणू भागात जाणारे बहुतांशी प्रवासी अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून पनवेल, दिव्याहून सुटणाऱ्या शटलने प्रवास करतात. भिवंडी ग्रामीण पट्ट्यात मोठया प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना कल्याणहून बस, रिक्षेच्या सुविधा आहेत. परंतु, या प्रवासासाठी प्रवाशांना दररोज १५० ते २०० रुपये खर्च येतो. बहुतांशी प्रवासी अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतात.

हेही वाचा… उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत

पनवेल, दिव्याहून सुटणाऱ्या शटलची संख्या तुरळक असल्याने प्रवाशांना नियोजित वेळेतील शटलची वाट पाहत अप्पर कोपर स्थानकात थांबावे लागते. उन्हाळ्यात कडक उन्हामुळे प्रवासी जिन्यावर येऊन बसत होते. आता पाऊस सुरू झाल्यामुळे प्रवाशांना जिन्याचा आधार घ्यावा लागतो. मुसळधार पाऊस सुरू असताना शटल स्थानकात आली तर छत्री घेऊन शटल पकडताना प्रवाशांची कसरत होते.

प्रवाशांची होणारी कुचंबणा विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील निवार नसलेल्या भागात निवाऱ्याची सुविधा करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kopar railway station there is no shelter on the platform so the passengers are using stairs dvr
Show comments