ठाणे : महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी व्हावी आणि ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांना मिळणाऱ्या मतांचे विभाजन व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तकाने काँग्रेसचे बंडखोर मनोज शिंदे यांना दोन ते तीन कोटी रुपये दिल्याचा आरोप काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजय आशर यांनी पैसे दिल्याचेही ते म्हणाले.
कोपरी पाचपाखाडी विधासनभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात. शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरे गटाने या मतदारसंघात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी ही लढत होणार आहे. केदार दिघे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतानाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव मनोज शिंदे आणि महाराष्ट्र ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुरेश खेडेपाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे अशी पक्षाकडून सूचना करण्यात आली होती. परंतु दोघांनीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता या मतदारसंघात काही प्रमाणात महाविकास आघाडीचे मतविभाजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज शिंदे आणि सुरेश खेडेपाटील यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. मनोज शिंदे आणि पाटील यांच्याशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
लोकसभा निवडणूकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदे गटाचे मताधिक्य घटले होते. त्यामुळे आता बलाढ्य असतानाही मतविभाजनासाठी उमेदवार उभे करावे लागत आहेत अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. मनोज शिंदे यांना दोन ते तीन कोटी रुपये मिळाल्याचे समजते आहे असा दावा चव्हाण यांनी केला. त्यांना अजय आशर या व्यक्तीकडून पैसे मिळाल्याचेही ते म्हणाले.