डोंबिवली – मागील काही दिवसांपासून ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळ्या चोऱ्यांचे प्रकार भामट्या दुचाकीस्वारांकडून पुन्हा सुरू झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी एका पादचारी महिलेल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी हिसकावून पळ काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, सुनीता रोहीदास धस या महिला खंबाळापाडा भागातील एका सोसायटीत राहतात. शनिवारी संध्याकाळी सुनीता आणि त्यांच्या मैत्रिणी ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर फिरण्यासाठी आल्या होत्या. रस्त्याच्या कडेने गप्पा मारत जात असताना अचानक पाठीमागून एका दुचाकीवरून दोन जण आले. ते पुढे वेगाने जातील असे वाटले असताना, दुचाकीस्वाराने अचानक दुचाकी तक्रारदार सुनीता धस यांच्या अंगावर आणली. त्या घाईने बाजुला झाल्या. तेवढ्यात सुनीता यांना काही कळण्याच्या आत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या भामट्याने सुनीता यांच्या मानेवर जोराने थाप मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. ते सुसाट वेगाने पळून गेले.

हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका

हेही वाचा – राणांसमोर घटक पक्षांची एकजूट राखण्‍याचे आव्‍हान

हेही वाचा – जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कोण याचा तिढा सुटेना

सुनीता आणि त्यांच्या मैत्रिणींनी चोर म्हणून ओरडा केला, पण तोपर्यंत ते पळून गेले होते. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी ९० फुटी रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ गस्त ठेवली होती. त्यामुळे या भुरट्या चोरांचे या भागातील प्रमाण थांबले होते. ते प्रकार पुन्हा आता सुरू झाले आहेत. या भुरट्या चोऱ्या करणारे बहुतांशी चोर पोलिसांनी यापूर्वी डोंबिवलीतील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीमधून पकडले होते. त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीच्या भागात पोलिसांनी एक चौकी सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thakurli the mangalsutra around the woman neck was stolen from 90 futi road ssb