ठाणे : दिवा येथील साबेगाव भागात सोमवारी रात्री विजेचा झटका लागून दोनजण जखमी झाले. सुरज गुरव (२१) आणि आशुतोष कुमार (२२) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साबेगाव येथे सुरज आणि आशुतोष राहतात. सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोघेही येथील महापालिका शाळेच्या परिसरातून पायी जात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : डोंबिवलीत रस्त्यावरील तुटलेल्या झाकणामुळे अपघाताची शक्यता

त्यावेळी टोरंट कंपनीच्या विद्युत तारांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. त्यावेळी या वीजेच्या तारेच्या संपर्कात येऊन सुरज आणि आशुतोष यांना विजेचा झटका बसला. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane 2 injured after being electrocuted by electricity wires css