ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून २० वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी भिवंडीतील फतामानगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या महिलेच्या वडिलांनी तिच्या सारच्यांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी तिच्या नवरा, सासु आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर वाहने उभे करणाऱ्यांना गाढवाची उपमा, टाटा लाईनखाली दुचाकी वाहनांचे बेशिस्त वाहनतळ

भिवंडीतील गायत्रीनगर परिसरात लग्नापूर्वी ही महिला आपल्या आई-वडिलांसह राहत होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये तिचा विवाह फतामानगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत झाला. या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. परंतू, लग्नानंतर सासरच्यांकडून होत असलेल्या त्रासामुळे महिला महिनाभर माहेरीच राहत होती, असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. महिनाभरानंतर ती सासरी परत गेल्यानंतर नवरा, सासू आणि नणंदेकडून वारंवार मानसिक आणि शारिरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Story img Loader